Home /News /videsh /

पाकिस्तानात एकाच वेळी 60 हिंदूंचं सक्तीनं धर्मांतर, VIDEO VIRAL

पाकिस्तानात एकाच वेळी 60 हिंदूंचं सक्तीनं धर्मांतर, VIDEO VIRAL

पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये एकाच वेळी 60 हिंदूंचं धर्मांतर (conversion) करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

    कराची, 12 जुलै: अल्पसंख्याक समुदायावरील अत्याचारासाठी बदनाम असलेल्या पाकिस्तानमधील आणखी एक धक्कादायक घटना (shocking news from Pakistan) समोर आली आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये एकाच वेळी 60 हिंदूंचं धर्मांतर (conversion) करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. सिंध प्रांतामधील मिरपूर आणि मीठी या भागातील हिंदूंचे धर्मांतर करण्यात आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सिंध प्रांतामधील मताली नगर समितीचे अध्यक्ष अब्दुल रऊफ निजमानी यांनी त्यांच्या फेसबुक प्राईफालवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मौलवी या हिंदूना कलमा शिकवत आहे. त्यावेळी त्यांचा चेहरा उतरल्याचं स्पष्ट दिसत आहे. धर्मांतरामध्ये कुणाचा हात? एकाच वेळी मोठ्या संख्येनं झालेल्या या धर्मांतरामध्ये सिंध प्रांतामधील कुख्यात मौलवी मियां मिठ्ठू आणि अब्दुल रऊफ निजमानी यांचा हात असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानातील हिंदू मुलींचे जबरदस्तीने अपहरण करणे आणि त्यांना इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडण्यासाठी हा मियां मिठ्ठू कुख्यात आहे. 'एकही हिंदू राहणार नाही' पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात काम करणारे मानवाधिकार कार्यकर्ते डॉ. राजकुमार वंजारा यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. कराचीतील वंजारा यांनी फेसबुकवरुन ही प्रतिक्रिया दिली आहे. "सर्वांचे अभिनंदन. घाबरू नका. पाकिस्तान लवकरच शंभर टक्के मुस्लीम देश होणार आहे. आज 60 हिंदूचे धर्मांतर झाले.' पाकिस्तानात 7 मुली झाल्या सर्जन, कट्टरपंथियांचं खवळलं पित्त, पातळी सोडून टीका पाकिस्तानात धर्मांतर ही सामान्य बाब बनली आहे. या प्रकरणाच्या सूत्रधारांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. पाकिस्तानात एकही हिंदू शिल्लक राहणार नाही, तो दिवस फार दूर नसल्याची हताश प्रतिक्रिया वंजारा यांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Hindu, Muslim, Religion

    पुढील बातम्या