मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बापरे! जर्मनीत कोरोनानं मोडला एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांचा रेकॉर्ड; सापडले तब्बल 65,371 रुग्ण

बापरे! जर्मनीत कोरोनानं मोडला एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांचा रेकॉर्ड; सापडले तब्बल 65,371 रुग्ण

या देशात दिवसाचे हजारो रुग्ण पॉझिटिव्ह येताहेत. त्यातच आता जर्मनीत कोरोनानं एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांचा रेकॉर्ड मोडला आहे.

या देशात दिवसाचे हजारो रुग्ण पॉझिटिव्ह येताहेत. त्यातच आता जर्मनीत कोरोनानं एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांचा रेकॉर्ड मोडला आहे.

या देशात दिवसाचे हजारो रुग्ण पॉझिटिव्ह येताहेत. त्यातच आता जर्मनीत कोरोनानं एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांचा रेकॉर्ड मोडला आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

बर्लिन, 18 नोव्हेंबर: भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरी जगभरातील काही देशांमध्ये मात्र अक्षरशः हाहाकार (Corona virus in world) सुरु आहे. काही देशांमध्ये चौथी, सहावी किंवा सातवी कोरोनाची (Corona waves in all over world) लाट सुरु आहे. याच देशांपैकी एक जर्मनी (Corona in Germany) आहे. जर्मनीत कोरोनाचा संसर्ग वाऱ्यासारखा पसरला आहे. या देशात दिवसाचे हजारो रुग्ण पॉझिटिव्ह येताहेत. त्यातच आता जर्मनीत कोरोनानं एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांचा रेकॉर्ड मोडला आहे.

रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूट (RKI), जर्मनीच्या रोग आणि नियंत्रण केंद्रानं गेल्या 24 तासांत तब्बल 65,371 नवीन प्रकरणे नोंदवली आहेत. विशेष म्हणजे मागील 24-तासांच्या कालावधीच्या तुलनेत ही 12,545 नवीन रुग्णांची वाढ आहे. परंतु हे आकडे कमी नोंदवले जाण्याची शक्यता आहे आणि संक्रमणाचे खरे प्रमाण "दुप्पट किंवा तीन पट जास्त असू शकते," आरकेआयचे प्रमुख लोथर विलर यांनी बुधवारी संध्याकाळी सॅक्सनीचे राज्य प्रमुख मायकेल क्रेत्शमर यांच्याशी ऑनलाईन झालेल्या चर्चेदरम्यान म्हंटलं आहे.

जर्मनीमध्ये सध्या प्रति 100,000 लोकांमागे तब्बल 336.9 लोकं हे कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे हा युरोपातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत भयंकर आकडा आहे. हा आकडा एका आठवड्यापूर्वी 249.1 इतका होता मात्र आता या आकड्यात अचानक वाढ झाली आहे.

कर्नालमधले MBBS डॉक्टर रोज शेण खातात; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

लसीकरणच नाही

जर्मनीमध्ये पश्चिम युरोपमधील सर्वात कमी लसीकरण झालं आहे. एकूण लोकसंख्येच्या फक्त 67% लोकसंख्येने पूर्णपणे लसीकरण केले आहे. RKI नुसार, सुमारे 33% लोकांना व्हायरसपासून संरक्षण नाही. हे एक कारण आहे की संसर्ग विक्रमी पातळीवर गेला आहे असं तज्ञ म्हणतात.

"जर्मनीमधील सध्याची साथीची परिस्थिती नाट्यमय आहे, मी ते इतर कोणत्याही प्रकारे सांगू शकत नाही, हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू पूर्वीच्या दरापेक्षा खूपच कमी पातळीवर आहेत, परंतु देशाच्या लसीकरण कव्हरेजमधील अंतरांबद्दल चिंता वाढत आहे. जेव्हा अतिदक्षता विभाग भरलेले असतील तेव्हा पावलं उचलणं महागात पडेल, कारण तेव्हा खूप उशीर झालेला असेल'' असे आउटगोइंग चांसलर मर्केल यांनी बुधवारी संपूर्ण जर्मनीतील महापौरांना सांगितले.

First published:

Tags: Corona spread, World news