मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Elon Musk : Google संस्थापकाच्या पत्नीशी अफेयरबाबत मस्कनं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

Elon Musk : Google संस्थापकाच्या पत्नीशी अफेयरबाबत मस्कनं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

गूगलचे सह संस्थापक सर्जे ब्रिन (Google Co-founder) यांच्या बायकोशी एलॉन यांचं अफेअर (Elon Musk affair with Google co-founder’s wife) असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.

गूगलचे सह संस्थापक सर्जे ब्रिन (Google Co-founder) यांच्या बायकोशी एलॉन यांचं अफेअर (Elon Musk affair with Google co-founder’s wife) असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.

गूगलचे सह संस्थापक सर्जे ब्रिन (Google Co-founder) यांच्या बायकोशी एलॉन यांचं अफेअर (Elon Musk affair with Google co-founder’s wife) असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे.

मुंबई, 25 जुलै : टेस्ला कंपनीचा संस्थापक अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क (Elon Musk) गेल्या काही दिवसांपासून वारंवार चर्चेत आहेत. आपल्याच एका कंपनीतील एक्झिक्युटिव्हशी असलेलं अफेअर (Elon Musk affair) असो, किंवा मग ट्विटर कंपनीशी घेतलेला पंगा (Elon Musk Twitter deal) यामुळे मस्क कायम बातम्यांमध्ये आहेत. यानंतर आता आणखी एका गोष्टीमुळे त्यांचं चर्चेत आले आहेत. गुगलचे सह संस्थापक सर्जे ब्रिन (Google Co-founder) यांच्या बायकोशी एलॉन यांचं अफेअर (Elon Musk affair with Google co-founder’s wife) असल्याच्या चर्चा सध्या इंटरनेटवर सुरू आहेत. निकोल शानाहन (Nicole Shanahan) असं या महिलेचं नाव आहे. मात्र, हे सगळं ‘बुलशिट’ असल्याचं म्हणत एलॉनने या चर्चांना पूर्णविराम दिलाय. एनडीटीव्हीने या बाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय आहे प्रकरण? वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ report on Elon Musk affair) या आघाडीच्या वृत्तपत्राने एलॉन आणि निकोल यांचं अफेअर असल्याची बातमी प्रसिद्ध केली आहे. हे अफेअर समोर येण्यापूर्वी एलॉन आणि सर्जे हे दोघे चांगले मित्र होते असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. '2021 साली डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मायामीमध्ये झालेल्या आर्ट बेसेल या इव्हेंटमध्ये मस्क आणि सर्जे उपस्थित होते. आर्ट बेसेल (Art Basel Elon Musk) हा काही दिवस चालणारा वार्षिक महोत्सव आहे, ज्यामध्ये जगभरातील श्रीमंत लोक उपस्थित राहतात. या ठिकाणी मस्क यांनी गुडघ्यावर बसून ब्रिन यांची माफी मागितली, अशी माहिती या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या व्यक्तींनी सांगितली' असं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या बातमीत दिलंय. ब्रिन (Sergey Brin) यांनी या वर्षी जानेवारीमध्ये आपल्या पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. 15 डिसेंबर 2021 नंतर आपण एकत्र राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आपल्या आणि पत्नीच्या विचारांमध्ये भरपूर तफावत असल्याचं कारण त्यांनी घटस्फोटासाठी दिलं होतं. यानंतर आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या या रिपोर्टमुळे याबाबत अधिकच चर्चा सुरू झाली आहे. सावधान! कोरोनानंतर आता `या` विषाणूचं जगावर संकट; घानामध्ये दोन जणांचा मृत्यू मस्क यांनी फेटाळले आरोप एलॉन मस्क यांनी मात्र हे सगळं ‘बुलशिट’ (Elon Musk calls affair news BS) असल्याचं म्हणत हे आरोप फेटाळले आहेत. “सर्जे आणि मी चांगले मित्र आहोत, आणि काल रात्रीच आम्ही एका पार्टीत एकत्र होतो. निकोलला मी गेल्या तीन वर्षात केवळ दोन वेळा भेटलो आहे, या दोन्ही वेळा आमच्यासोबत इतर लोकही होते. यामध्ये रोमँटिक असं काहीच नव्हतं.” अशा आशयाचं ट्विट एलॉन यांनी (Elon Musk tweet) केलं आहे. Japan Volcano: ज्वालामुखीच्या उद्रेकानं पसरली राख; भर दिवसा अंधार! ब्रिन-मस्क चांगले मित्र ब्रिन आणि मस्क हे खूप आधीपासून एकमेकांचे मित्र आहेत. टेस्ला कार पहिल्यांदा ज्या व्यक्तींना मिळाली होती त्यामध्ये ब्रिन यांचा समावेश होता. तसंच, 2008 साली टेस्ला कंपनीवर आर्थिक संकट आल्यानंतर ब्रिन यांनी मस्क यांना पाच लाख यूएस डॉलर्सची मदतही केली होती.
First published:

Tags: Elon musk, Relationship

पुढील बातम्या