Home /News /videsh /

ट्रम्प यांनी बायडेनवर फोडलं अफगाणिस्तानच्या परिस्थितीचं खापर! म्हणाले...

ट्रम्प यांनी बायडेनवर फोडलं अफगाणिस्तानच्या परिस्थितीचं खापर! म्हणाले...

अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थितीला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) जबाबदार आहेत, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे.

    मुंबई, 13 ऑगस्ट :  अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थितीला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) जबाबदार आहेत, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे. बायडेन यांनी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून मागे  घेताना कोणतीही अट ठेवली नाही. त्यामुळेच तालिबानी दहशतवाद्यांना मोकळं रान मिळालं आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. बायडेन यांनी अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी 31 ऑगस्ट ही तारीख निश्चि्त केली आहे. मी राष्ट्रपती असतो तर वेगळा करार केला असता, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं 2020 साली दोहामध्ये तालिबानसोबत करार केला होता. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच होते. त्यानंतर अमेरिकन सैन्यानं मे 2021 पासून अफगाणिस्तानमधून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, 'मी राष्ट्रपती असतो तर आम्ही काही अटींसह अफगाणिस्तानमधून बाहेर पडलो असतो, हे जगाने पाहिले असते. मी स्वत: तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. ते जे काही करत आहेत, ते सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांना दिला होता. ' असा दावा त्यांनी केला. दुसऱ्या क्रमांकाचं शहर तालिबान्यांच्या ताब्यात अमेरिका (US Army) आणि नाटोचं लष्कर (NATO) जोपर्यंत अफगाणिस्तानात होतं तोपर्यंत शांतता होती आणि तालिबानला खूप मोठा पल्ला गाठता आला नाही. पण हे सैन्य निघून गेल्यानंतर तालिबानने (Taliban Terror) प्रचंड दहशत माजवत शुक्रवारी देशातलं दुसरं मोठं शहर कंदाहारवर कब्जा मिळवला असं वृत्त वृत्तसंस्था एएफपीने दिलं आहे. आता तालिबान अफगाणिस्तानच्या राजधानीचं शहर असलेल्या काबुलच्या जवळ पोहोचलं असून काबुलला धोका निर्माण झाला आहे. 'प्रार्थना करा..'; महिला पत्रकारानी सांगितली अफगाणिस्तानातील भयंकर स्थिती  तालिबानने आतापर्यंत जरांज, शेबरगान, सर-ए-पुल, कुंदुज, तालोकान, ऐबक, फराह, पुल ए खुमारी, बदख्शां, गजनी, हेरात, कंदाहार या 12 राज्यांच्या राजधानीच्या शहरांवर (State Capitals) कब्जा केला आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी थेट सैन्याला पाचारण करण्यात येणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, Donald Trump, Taliban

    पुढील बातम्या