मराठी बातम्या /बातम्या /विदेश /7 दिवसात दुसऱ्यांदा झाला ज्वालामुखीचा उद्रेक, हजारो नागरिक बेघर

7 दिवसात दुसऱ्यांदा झाला ज्वालामुखीचा उद्रेक, हजारो नागरिक बेघर

कांगोमधील (Congo) गोमा (Goma) शहराजवळ पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक (volcanic-eruption) झाला आहे.

कांगोमधील (Congo) गोमा (Goma) शहराजवळ पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक (volcanic-eruption) झाला आहे.

कांगोमधील (Congo) गोमा (Goma) शहराजवळ पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक (volcanic-eruption) झाला आहे.

गोमा (कांगो), 30 मे : कांगोमधील (Congo) गोमा (Goma) शहराजवळ पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक (volcanic-eruption) झाला आहे. गोमा शहराच्या जवळच्या माऊंट नीरागोंगोच्या उत्तर दिशेला शनिवारी पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, अशी माहिती कांगो सरकारने दिली आहे.

कांगो सरकारच्या संचार आणि मीडिया मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 'माऊंट नीरागोंगोच्या उत्तर भागात कमी तीव्रतेच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा ज्वालामुखी बाहेर आल्याने विरुंगा पार्कच्या अंतर्गत भागात राहणाऱ्या नागरिकांना निर्जन स्थळी हलवण्यात आले आहे.

कांगोच्या उत्तर-पूर्व भागातील किवू प्रांताची राजधानी असलेल्या गोमा शहराच्या जवळ दोन सक्रीय ज्वालामुखी आहेत. यापूर्वी 22 मे रोजी नीरागोंगो ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला होता. या ज्वालामुखीचा लाव्हा शहरात पसरल्याने 500 घरांचे नुकसान झाले.

गोमातील वेधशाळेच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर निघणाऱ्या धुरातील विषारी गॅसच्या संपर्कात आल्याने या नागरिकांचा मृत्यू झाला. वेधशाळेतील नागरिक याबबतची पूर्वसूचना देण्यास अपयशी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकाच शाळेमध्ये 215 मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, अनेकांचं वय तीन वर्षापेक्षाही कमी

संयुक्त राष्ट्र बाल कोष (युनिसेफ) ने दिलेल्या माहितीनुसार 22 मे रोजी माउमट नीरागोंगो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने गोमा शहरातील जवळपास  5 हजार नागरिकांनी दुसरिकडे स्थालंतर केले आहे. तर 2500 नागरिकांनी उत्तर पश्चिमेकडील साका शहरामध्ये आश्रय घेतला आहे. या घटनेनंतर 170 पेक्षा जास्त मुलं बेपत्ता आहेत.  या मुलांच्या मदतीसाठी शिबिर स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कांगोमध्ये यापूर्वी 2002 साली या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होती तर 1 लाखांपेक्षा जास्त नागरिक बेघर झाले होते.

First published:

Tags: World news