Home /News /videsh /

सांभाळून राहा! चीनकडून भारताची सायबर हेरगिरी? ही माहिती लीक होण्याची भीती

सांभाळून राहा! चीनकडून भारताची सायबर हेरगिरी? ही माहिती लीक होण्याची भीती

Cyber Attack: चीनकडून भारताची सायबर हेरगिरी केली जात असल्याचं वृत्त आहे. जाणून घ्या सविस्तर वृत्त.

नवी दिल्ली, 18 जून : चीनकडून भारताची सायबर हेरगिरी केली जात असल्याचं वृत्त आहे. सायबर धोक्याची गुप्त माहिती देणाऱ्या कंपनीने गुरुवारी (17 जून) सांगितलं, की चीनच्या सायबर हल्लेखोरांनी (Cyber Attackers) भारतीय टेलिकॉम कंपन्या, सरकारी यंत्रणा आणि अनेक डिफेन्स काँट्रॅक्टर्सना शिकार केलं आहे. चीन भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात सायबर हल्ले करत असल्याचं वृत्त याआधीही आलं होतं. आता हे नवे सायबर हल्ले भारतीय सैन्याची माहिती गोळा करण्यासाठी केले जात असल्याचं वृत्त आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. रेकॉर्डेड फ्युचर (Recorded Future) नावाच्या कंपनीच्या Insikt Group च्या असं लक्षात आलं आहे, की एक चिनी समूह 2020 आणि 2021मध्ये सायबर हेरगिरीच्या माध्यमातून अनेक भारतीय संस्थांना लक्ष्य करत आहे. RedFoxtrot असं त्या समूहाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. याआधी कंपनीने सांगितलं होतं, की चीन ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि बंदर क्षेत्रं यांना लक्ष्य करत आहे. त्या वेळी समूहाची ओळख RedEcho या नावाने झाली होती. त्या कंपनीचं मुख्यालय अमेरिकेत आहे. रेकॉर्डेड फ्यूचरच्या Insikt Group च्या एका व्यक्तीने हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं, की खासकरून भारतात एका समूहाच्या हालचाली आमच्या लक्षात आल्या आहेत, की जो समूह गेल्या सहा महिन्यांत दोन टेलिकॉम संस्था, तीन डिफेन्स काँट्रॅक्टर्स आणि अनेक सरकारी आणि खासगी संस्थांना लक्ष्य करून त्यांची सायबर हेरगिरी करत आहे. भारत आणि चीन (India & China) यांच्यादरम्यान तणावाचं वातावरण होतं, त्या वेळी हा कारभार झाला, असंही त्या व्यक्तीने सांगितलं. प्रभावित कंपन्यांना याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. हेही वाचा- तुमच्या जिल्ह्यातला पॉझिटिव्हीटी रेट किती? जाणून घ्या आकडेवारी रेकॉर्डेड फ्यूचरने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे, की नेटवर्क ट्रॅफिक, हल्लेखोरांकडून वापरण्यात आलेल्या मालवेअरच्या फूटप्रिंट्स, डोमेन रजिस्ट्रेशन रेकॉर्डस् आणि डेटा ट्रान्स्मिटिंगचं विश्लेषण यांवर ही माहिती आधारित होती. 'या क्षेत्रातल्या संस्थांना वारंवार लक्ष्य करण्यासाठी RedFoxtrot द्वारे सैन्य आणि सुरक्षाव्यवस्था यांबद्दल माहिती मिळवण्यासाठी सायबर हेरगिरी मोहीम चालवली जात आहे,' असं कंपनीच्या प्रतिनिधीच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. रेकॉर्डेड फ्यूचरच्या विश्लेषणातून असं समोर आलं आहे, की RedFoxtrot चा संबंध पीपल्स लिबरेशन आर्मीच्या युनिट 69010शी जोडलेला आहे. त्याचं मुख्यालय चीनमधील शिंजियाच्या उरुमकी परिसरात असू शकतं. मार्च 2021मध्ये भारतीय कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सांगितलं होतं, की चीनशी संबंधित व्यक्ती भारतीय परिवहन क्षेत्राबद्दल हेरगिरी करत असल्याचे संकेत त्यांना मिळाले आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: China, Cyber crime, India

पुढील बातम्या