Home /News /videsh /

कचऱ्यात फेकला 2000 कोटींचा खजिना... शोध घेण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला

कचऱ्यात फेकला 2000 कोटींचा खजिना... शोध घेण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला

एका व्यक्तीनं त्याचा हार्ड ड्राईव्ह कचऱ्यात फेकून दिला. त्यामध्ये 2000 कोटींचा खजिना दडला आहे.

    मुंबई, 5 ऑगस्ट :  सध्या जगभरात बिटकॉईनची चर्चा आहे. बिटकॉईनच्या माध्यमातून अनेक जणांना अक्षरश: लॉटरी लागल्याचीही उदाहरणं आहेत. पण काही वर्षांपूर्वी मात्र बिटकॉईनबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम होता. काहीजणांनी तर घेतलेली बिटकॉईन्स निराश होऊन टाकून दिली होती. असाच एक धक्कादायक प्रकार ब्रिटनमध्ये समोर आला आहे. 2013 मध्ये एका व्यक्तीनं त्याच्याकडचा हार्ड ड्राईव्ह कचऱ्यात फेकून दिला होता. त्यात बिटकॉईन सेव्ह केलेले होते. त्याची किंमत आत्ता 2 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. याबद्दल 'झी न्यूज'च्या वेबसाईटवर वृत्त देण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? ब्रिटनमध्ये राहणाऱ्या जेम्स हॉवेल्स James Howells) यानं 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये त्याच्याकडील हार्ड ड्राईव्ह (Hard Drive) फेकून दिला. या हार्ड ड्राईव्हमध्ये बिटकॉईन (Bitcoin) स्टोअर केलेले होते. या हार्ड ड्राईव्हमधील बिटकॉईनची किंमत आता 261 मिलियन म्हणजे 2 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली आहे. आपण आता जे कचऱ्यात फेकत आहोत त्याची किंमत काही वर्षांनी हजारो कोटी रुपये होणार आहे याचा अर्थातच जेम्सला त्यावेळेस अंदाज नव्हता. ब्रिटनमधल्या न्यूपोर्ट (Newport) इथली ही घटना असल्याचं न्यूज डॉट कॉम डॉट एयू (News.com.au) मधील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आता रोबो डॉग (Robot Dog)च्या मदतीने जेम्स आपला हार्ड ड्राईव्ह शोधून काढणार असल्याची माहिती आहे. जेम्स हॉवेल्स हा व्यवसायानं आयटी इंजिनीअर (IT Engineer) आहे. हजारो कोटी रुपयांची बिटकॉईन्स असलेला हार्ड ड्राईव्ह शोधण्यासाठी आता जेम्स 150 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करायला तयार असल्याचंही सांगितलं जात आहे. तैवानसाठी सोडलं अन् जपानमध्ये पोहोचलं; China-Taiwan मिसाइल्स हल्ल्यातील विचित्र घटना कसा घेणार शोध? अगदी व्यावसायिक पद्धतीने हा हार्ड ड्राईव्ह शोधला जाईल असं जेम्स हॉवेल्सने सांगितलं आहे. अशाप्रकारची मोहीम नासानं या पूर्वी हाती घेतली होती. लँडफिलमध्ये (Landfill) हार्ड ड्राईव्ह शोधला जाणार आहे. कोलंबियात AI फर्मच्या मदतीने 2003 मध्ये एक हार्ड ड्राईव्ह स्पेस शटल डिझास्टरच्या मदतीने शोधण्यात आलं होतं. न्यू पोर्ट सिटीच्या लँडफील्डमध्ये हार्ड ड्राइव्ह शोधण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागू शकतो. पहिल्यांदा न्यूपोर्ट महानगरपालिकेने या तीन वर्ष चालणाऱ्या हार्ड ड्राइव्ह शोध मोहिमेमुळे इकॉलॉजिकल रिस्क आहे असं मत व्यक्त केलं होतं पण नंतर ही मोहीम सुरू करायला परवानगी दिली आहे. कचऱ्यातून सोनं निर्माण होतं असं आपण अनेकदा ऐकतो, पण वेळेवर किंमत कळली नाही तर सोन्यासारखी किंमत असलेल्या वस्तूही कचऱ्यात जातात हेच यावरून स्पष्ट होतं. आता जेम्स त्याचा हा हार्ड ड्राईव्ह शोधू शकतो का हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
    First published:

    Tags: Britain, World news

    पुढील बातम्या