Home /News /videsh /

कोंडी सुटली: भारतामध्ये अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना मोठा दिलासा

कोंडी सुटली: भारतामध्ये अडकलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना मोठा दिलासा

भारतामधून ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी इच्छूक असलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना (Australian Citizens) मोठा दिलासा त्यांच्या सरकारनं दिला आहे.

    सिडनी, 7 मे: भारतामधून ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी इच्छूक असलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना (Australian Citizens) मोठा दिलासा त्यांच्या सरकारनं दिला आहे. या नागरिकांना भारतामधून मायदेशी परतण्यावरील बंदी 15 मे रोजी उठवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrision) यांनी ही घोषणा केली आहे. भारतामध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ऑस्ट्रेलियन सरकारने यापूर्वी या नागरिकांना मायदेशी परतण्यावर बंदी घातली होती. काय होता निर्णय? ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील पहिलाच अशा प्रकारचा निर्णय आहे. यानुसार ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी 14 दिवस भारतामध्ये वास्तव्य असलेल्या नागरिकांना 5 वर्षांपर्यंत किंवा 66 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड  अशी तरतूद ऑस्ट्रेलियन सरकारच्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. सरकारनं याबाबत नवा Biosecurity Act संमत केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारनं 15 मे पर्यंत भारतामधून येणाऱ्या विमानांना ऑस्ट्रेलियन सरकारनं बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियातील अनेक खासदार, डॉक्टर, उद्योगपती आणि स्वयंसेवी संस्थांनी या निर्णयावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत 15 नंतर हा निर्णय मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलिया 15 मे ते 31 मे दरम्यान नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी तीन विमान पाठवणार आहे. पहिलं विमान 15 मे रोजी डार्विनमध्ये पोहचेल. या देशात 12 वर्षांच्या मुलांना मिळणार Corona लस, पहिल्यांदाच Pfizer ला मिळाली मान्यता भारतामधून ऑस्ट्रेलियाला थेट प्रवासी विमानसेवा सुरु होण्यास बंदी कायम आहे. "आम्ही भारतामधून ऑस्ट्रेलियन नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सर्वात प्रथम सर्वात जास्त संकटात असलेल्या 900 नागरिकांना परत आणले जाईल, " असे मॉरिसन यांनी सांगितले. आम्ही जवळपास 20 हजार नागरिकांना परत आणण्याची व्यवस्था केली आहे, हे मोठं काम असून 15 मे पासून या कामाला सुरुवात होईल, असं मॉरिसन यांनी स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Coronavirus, Covid-19, India, International

    पुढील बातम्या