• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Love Story In Corona : दोन ज्येष्ठ नागरिकांचं जुळलं, 95 व्या वर्षी केलं लग्न

Love Story In Corona : दोन ज्येष्ठ नागरिकांचं जुळलं, 95 व्या वर्षी केलं लग्न

प्रेमात पडायला आणि त्यानंतर लग्न करायला कोणतंही वय नसतं, असं म्हणतात. साधारणपणे जे वय मुलांवर सर्व जबाबदारी सोपवून परमेश्वराचं नामस्मरण करण्याचे मानले जाते, त्या वयात दोन ज्येष्ठ नागरिकांनी (senior citizen) लग्न केलं आहे

 • Share this:
  न्यूयॉर्क, 12 जून : प्रेमात पडायला आणि त्यानंतर लग्न करायला कोणतंही वय नसतं, असं म्हणतात. साधारणपणे जे वय मुलांवर सर्व जबाबदारी सोपवून परमेश्वराचं नामस्मरण करण्याचे मानले जाते, त्या वयात दोन ज्येष्ठ नागरिकांनी (senior citizen) लग्न केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनी कोरोना काळात (Covid 19) डेटींग सुरु केले. कोरोना काळातील कडक निर्बंधामुळे त्यांच्या भेटीमध्ये अनेक अडथळे आले, पण त्यावर त्यांनी मात केली आणि आता वयाच्या 95 व्या वर्षी एकमेकांशी लग्न केले. अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) येथील हा सर्व प्रकार आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर जॉन शुल्टस यांची भेट अचानक जॉय मोरो-नल्टन यांच्याशी झाली. अगदी कमी वेळेत दोघांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. कोरोना काळातही त्यांनी एकमेकांना भेटणे थांबवले नाही. एकत्र घेतली लस या दोघांचे प्रेम कोरोना काळात अधिक फुललं. या दोघांनी एकत्रच कोरोना लस घेतली. सरकारने कोरोना नियम शिथिल केल्यानंतर त्यांचे आयुष्य सुरळीत सुरू झाले. त्यानंतर जॉन शुल्टस यांनी जॉय मोरो यांना लग्नाची मागणी घातली. या दोघांच्या लग्नापर्यंतच्या प्रवासात अनेक अडथळे आले. काही जणांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी त्यांची थट्टा केली. मात्र खऱ्या प्रेमात पडण्यासाठी तरुण असणे आवश्यक नसते असे जॉन आणि जॉय यांचे मत आहे. मुलांना काय  वाटते? जॉन यांच्या लग्न करण्याच्या निर्णयावर त्यांचे मुलंही खुश आहेत. या दोघांमध्ये चांगले सामंजस्य आहे. ते दोघं एकमेंकांशी रोज चर्चा करतात. दोघांनी पुढील प्रवास एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यापेक्षा सुंदर काय असू शकते? असा प्रश्न या मुलांनी विचारला. क्रूरतेचा कळस! पतीची हत्या करत महिलेचं विकृत कृत्य, गुप्तांग कापून तेलात तळलं आणि मग... त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं. तुमच्याकडं मनातील गोष्ट पूर्ण करण्याचे धाडस असेल तर तुम्ही कधीही म्हातारे असू शकत नाही, असं त्यांच्या मुलांनी सांगितले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: