मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भारतासह जगभरातील 60 देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स; आता WHO ने केली मोठी घोषणा

भारतासह जगभरातील 60 देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स; आता WHO ने केली मोठी घोषणा

मंकीपॉक्सचा धोका जागतिक स्तरावर दिसून येत असल्याचे WHO ने म्हटले आहे. या प्राणघातक विषाणूचा धोका युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक आहे. सध्याची परिस्थिती पाहता त्याचा आणखी आंतरराष्ट्रीय प्रसार होण्याचा स्पष्ट धोका आहे

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 24 जुलै : मंकीपॉक्स व्हायरस जगातील 60 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे. मंकीपॉक्सचा धोका जागतिक स्तरावर दिसून येत असल्याचे WHO ने म्हटले आहे. या प्राणघातक विषाणूचा धोका युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक आहे. सध्याची परिस्थिती पाहता त्याचा आणखी आंतरराष्ट्रीय प्रसार होण्याचा स्पष्ट धोका आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र आंतरराष्ट्रीय वाहतुकीत व्यत्यय येण्याचा धोका सध्या कमी आहे. दरम्यान हे सर्व धोके लक्षात घेऊन, WHO ने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केलं आहे (Monkeypox Global Public Health Emergency). Monkeypox Cases in India : कोरोनासोबत भारतात आता मंकीपॉक्सही पसरतो हातपाय; आणखी एक रुग्ण सापडल्याने खळबळ डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एडनॉम घेब्येयियस यांनी शनिवारी सांगितलं की, वेगाने पसरणारा मांकीपॉक्सचा उद्रेक जागतिक आरोग्य आणीबाणी दर्शवतो. जागतिक आरोग्य आणीबाणी हा जागतिक आरोग्य संघटनेचा सर्वोच्च पातळीचा इशारा आहे. ट्रेडोस म्हणाले की, आता मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याची गरज आहे. यासोबतच, लस आणि उपचार सामायिक करण्यासाठी निधी आणि जागतिक प्रयत्नांची गरज आहे. जिनिव्हा येथे मीडिया ब्रीफिंग दरम्यान आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय जाहीर करताना, टेड्रोस यांनी पुष्टी केली की समिती एकमत होण्यात अयशस्वी ठरली आहे. या वर्षी आतापर्यंत 60 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची 16,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि आफ्रिकेत या आजारामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की जगभरात वेगाने पसरत असलेल्या मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव योग्य रणनीतीने रोखला जाऊ शकतो. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की ते या रोगाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करत आहेत. कारण मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे प्रभावी माहिती आणि सेवा तयार करणे आणि वितरित करणे अत्यावश्यक आहे. मंकीपॉक्सवर सध्या कोणताही विशिष्ट उपचार नाही. रुग्णांना सामान्यतः विशेष रुग्णालयात राहावे लागेल, जेणेकरून संसर्ग पसरू नये आणि सामान्य लक्षणांवर उपचार करता येतील.
First published:

Tags: Virus

पुढील बातम्या