लवकरच दिसणार कोरोनाची खतरनाक 'सेकंड वेव्ह', या देशांना धोका; WHOचा इशारा

लवकरच दिसणार कोरोनाची खतरनाक 'सेकंड वेव्ह', या देशांना धोका; WHOचा इशारा

WHOनं दिलेल्या माहितीनुसार जर जगात कोरोनाचे दुसरे चरण सुरू झाल्यास ज्या देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी झाली आहेत त्या देशांमध्ये पुन्हा हा व्हायरस डोकं वर काढू शकतो.

  • Share this:

जिनिव्हा, 26 मे : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर यशस्वी लस किंवा औषधं शोधता आलेलं नाही आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) पुन्हा एकदा कोरोना संदर्भात जगाला अलर्ट केलं आहे. WHOच्या म्हणण्यानुसार चीन (China), यूरोप (Europe) आणि आता अमेरिकेत (US) कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र असे असले तरी लवकरच सेकंड वेव्हचा धोका जाणवू शकतो. WHOनं दिलेल्या माहितीनुसार जर जगात कोरोनाचे दुसरे चरण सुरू झाल्यास ज्या देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी झाली आहेत त्या देशांमध्ये पुन्हा हा व्हायरस डोकं वर काढू शकतो.

WHOचे आपतकालिन आरोग्य प्रोग्रामचे प्रमुख डॉ. माइक रेआन जगात कोरोनाची फर्स्ट व्हेव मध्यम टप्प्यात आली असून, बऱ्याच देशांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणं सापडली नाही आहेत. मात्र माइक यांनी येत्या काही दिवसांत आशियाई आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये कोरोनाची जास्त प्रकरणं समोर येऊ शकतात असाही इशारा दिला.

वाचा-COVID 19: WHOचा मोठा निर्णय, भारतात मिळणाऱ्या या औषधाच्या वापरावर तात्पुरती बंदी

कधी येणार कोरोनाचा सेकंड वेव्ह?

कोरोना व्हायरसमध्ये एक असा स्थर येतो, जेव्हा नवीन रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत विक्रमी वाढ होते, यालाच पीक म्हणतात. आता WHOने असा इशारा दिला आहे की जगातील काही देश हे सेकंड वेव्ह येण्याच्या मार्गावर आहे. रेआन यांनी असेही सांगितले की, या टप्प्यात असे चित्र समोर येईल ज्यात कोरोनामुक्त झालेल्या देशांमध्ये पुन्हा हा व्हायरस शिरकाव करेल.

वाचा-महाराष्ट्रात महासंकट, राज्याची तुलना देशाशी केली असता धक्कादायक आकडेवारी समोर

थंडीत वाढणार प्रकोप

रेआन म्हणाले की, पावसाळी आणि हिवाळ्यातील हवामान सामान्यत: संसर्गासाठी अनुकूल असते, यावेळी कोरोना संक्रमणाचा आकडा पुन्हा वाढेल. WHOच्या संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञ मारिया व्हॅन केरखॉव्ह यांनी सांगितले की सध्या सर्व देशांना हाय अलर्ट असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वेगवान चाचणी प्रणाली तयार केली पाहिजे. हा इशारा त्या देशांनाही आहे ज्यांचा असा विश्वास आहे की त्यांनी संक्रमणावर मात केली आहे. कोरोना हा असा व्हायरस आहे जो पुन्हा येऊ शकतो. हिवाळ्यात तो आणखी प्राणघातक असल्याचे सिद्ध झाले आहे.

वाचा-भारतात कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन; विषाणूतज्ज्ञांचा धक्कादायक दावा

First published: May 26, 2020, 8:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading