Home /News /videsh /

स्वाइन फ्लूपेक्षा कोरोना 10 पट खतरनाक; लस मिळाली नाहीतर...,WHOने व्यक्त केली चिंता

स्वाइन फ्लूपेक्षा कोरोना 10 पट खतरनाक; लस मिळाली नाहीतर...,WHOने व्यक्त केली चिंता

उत्तर पश्चिम चीनमधील गांसू प्रांतातील लान्झोउमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. लान्झोउ वेटरीनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये डिसेंबरमध्ये या आजाराच्या अँटीबॉडीची सूचना चीन सरकारला दिली होती.

उत्तर पश्चिम चीनमधील गांसू प्रांतातील लान्झोउमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. लान्झोउ वेटरीनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये डिसेंबरमध्ये या आजाराच्या अँटीबॉडीची सूचना चीन सरकारला दिली होती.

अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर लस शोधता आलेली नाही आहे. याबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) चिंता व्यक्त केली आहे.

    जिनिव्हा, 14 एप्रिल : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात 19 लाख 18 हजार 855 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 1 लाख 19 हजार 588 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर लस शोधता आलेली नाही आहे. याबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) चिंता व्यक्त केली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार कोव्हिड-19 हा 2009मध्ये आलेल्या स्वाइन फ्लूपेक्षा 10 पटीने भयंकर आहे. कोरोनापासून वाचवण्यासाठी आता फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे लस, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले. WHOचे महासंचालक टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम घेब्रेयसिस यांनी जिनिव्हा येथे घेतलेल्या बैठकीत सांगितले की, ही संस्था जगातील सर्वत्र पसरलेल्या नवीन विषाणूबद्दल सतत शिकत आहे. या विषाणूने जवळजवळ 1 लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे परिस्थिती किती भीषण आहे हे कळत आहे. वाचा-3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय, तरी PM मोदींना सतावतेय एक चिंता टेड्रॉस यांनी यावेळी, कोव्हिड-19चा वेगवान प्रसार होत आहे आणि हे आपल्याला माहित आहे की हा प्राणघातक आहे. 2009मध्ये आलेल्या स्वाइन फ्लूपेक्षा 10 पटीने हा रोग खतरनाक आहे. स्वाइन फ्लूनेही लाखो लोकांचा जीव घेतला होता. मात्र कोरोनामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे सांगितले. टेड्रॉसने यांनी दु: ख व्यक्त करत, काही देशांमध्ये दर तीन ते चार दिवसांत मृतांची संख्या दुप्पट होत आहे, यासाठी लवकरात लवकर चाचणी करणे गरजेचे आहे. क्लस्टर ट्रान्समिशन रोखणे हे आपल्या पुढील सर्वात मोठे आव्हान आहे, असे सांगितले. वाचा-संपूर्ण देश 3 मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा लस शोधणे महत्त्वाचे कोरोनाला रोखण्यासाठी लस तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र 50 देशांमध्ये संशोधन सुरू असतानाही एकाही देशाला अद्याप यश आलेले नाही आहे. WHOच्या म्हणण्यानुसार कोव्हिड -19 रोखण्यासाठी सध्या केवळ लसच मदत करू शकते. सध्या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे ही केवळ त्यांची प्रतिकारशक्ती वाढवत आहे. मात्र कोरोनाला मारण्यासाठी लसचं उपयोगी असल्याचे मत WHOने व्यक्त केले आहे. वाचा-लॉकडाऊनमध्येही थांबेना पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी, CCTVमध्ये कैद झाली चोरी 90 दिवसांत कोरोनाची लस होणार उपलब्ध इस्त्रायलमधील टेलीग्राम चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, 90 दिवसात ही लस तयार होणार आहे. येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ओफिर अकुनिस यांनी दावा केला आहे की, कोरोना दूर करण्यासाठी 90 दिवसांच्या आत लस तयार करेल. त्यांच्या मते ही एक अतिशय अनोखी आणि प्रभावी लस आहे. मिगेल गॅलेली रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांचेही मंत्री यांनी अभिनंदन केले. लवकरच ही लस वापरली जाईल आणि नंतर ती इतर देशांना दिली जाईल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या