मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

जगातील पहिलं Unisex Condom, कंडोम तयार करण्यासाठी या मटेरियलचा वापर

जगातील पहिलं Unisex Condom, कंडोम तयार करण्यासाठी या मटेरियलचा वापर

एका शास्त्रज्ञानं जगातला पहिला युनिसेक्स कंडोम (Unisex Condom) तयार केला आहे.

एका शास्त्रज्ञानं जगातला पहिला युनिसेक्स कंडोम (Unisex Condom) तयार केला आहे.

एका शास्त्रज्ञानं जगातला पहिला युनिसेक्स कंडोम (Unisex Condom) तयार केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

कुआलालम्पुर, 29 ऑक्टोबर: एक वेगळी बातमी समोर येतेय. मलेशियातील (Malaysia)एका शास्त्रज्ञानं जगातला पहिला युनिसेक्स कंडोम (Unisex Condom) तयार केला आहे. हा युनिसेक्स कंडोम स्त्री आणि पुरुष दोघेही वापरू शकणार आहेत. हा कंडोम मलेशियाच्या स्त्रीरोग तज्ज्ञानं (Gynaecologist) मेडिकल ग्रेड (Medical Grade Material) मटेरियलपासून बनवला आहे. यात वापरण्यात आलेली सामग्री जखमांच्या सर्जरीच्या ड्रेसिंगसाठी वापरली जाते.

युनिसेक्स कंडोम बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की, यामुळे लोकांचे सेक्सुअल हेल्थ सुधारेल. युनिसेक्स कंडोमचा महिला आणि पुरुष दोघांनाही फायदा होईल. युनिसेक्स कंडोम (Condom) एका बाजूनं चिकटणारा आहे.

हेही वाचा-  जामिनाची बातमी ऐकताच अशी होती आर्यन खानची पहिली Reaction

ट्विन कॅटालिस्ट फर्मचे स्त्रीरोगतज्ज्ञ जॉन टँग इंग चिन यांनी सांगितलं की, युनिसेक्स कंडोम हे इतर रेग्युलर कंडोमसारखंच आहे. फक्त ते पुरुष आणि स्त्रिया दोघेही वापरू शकतात. युनिसेक्स कंडोममध्ये रेग्युलर कंडोमपेक्षा जास्त प्रोटेक्शन आहे.

Wondaleaf युनिसेक्स कंडोमच्या प्रत्येक पॅकेटमध्ये दोन कंडोम असतील आणि त्याची किंमत 14.99 रिंगिट म्हणजेच सुमारे 270 रुपये असेल. मलेशियामध्ये 20-40 रिंगिटमध्ये डझनभर कंडोम खरेदी केले जाऊ शकतात.

हेही वाचा- पंतप्रधान मोदी इटली आणि ब्रिटनच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना 

स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) पॉलीयुरेथेनपासून (Polyurethane) युनिसेक्स कंडोम तयार करण्यात आलं आहे. हे मटेरियल (Transparent)पारदर्शक असते. पॉलीयुरेथेन मटेरियल अतिशय पातळ आणि फ्लेक्सिबल आहे. ते मजबूत आणि वॉटरप्रूफ असते.

जॉन टँग इंग चिन यांनी दावा केला आहे की, युनिसेक्स कंडोम इतकं पातळ आहे की, जेव्हा तुम्ही ते घालाल तेव्हा तुम्हाला समजणारही नाही. हे ड्रेसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरियलपासून बनवण्यात आलं आहे.

हेही वाचा- कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी नवं औषध, Capsule नं होणार उपचार

स्त्रीरोगतज्ज्ञ जॉन टँग इंग चिन यांनी सांगितलं की, अनेक क्लिनिकल रिसर्च आणि चाचणीनंतर युनिसेक्स कंडोम तयार करण्यात आलं आहे. युनिसेक्स कंडोम डिसेंबरपासून फर्मच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होतील.

First published:

Tags: Health Tips