World Cup Point Table : लंकेचा इंग्लडला दणका, टॉप 4 संघांना इशारा!

ICC Cricket World Cup 2019 : बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इंग्लंडला पराभूत करून लंकेने स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवलं

  • Share this:

वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इंग्लंडला पराभूत करून लंकेने स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवलं आहे. या विजयासह त्यांनी 6 गुणांसह गुणतक्त्यात पाचव्या स्थानी झेप घेतली. लंकेने आतापर्यंत 6 सामन्यात दोन विजय मिळवले तर दोन पराभव झाले. दोन सामने पावसाने रद्द झाले.

ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर विजय मिळवून 10 गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या स्थानी 9 गुणांसह न्यूझीलंड आहे.तर बांगलादेश 5 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

इंग्लंडला लंकेवर विजय मिळवून अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी होती. मात्र, पराभवामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. त्यांचे सहा सामन्यात 8 गुण झाले आहेत. तर भारत चौथ्या स्थानावर आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी सामने भारताचे झाले आहेत. भारताशिवाय इतर सर्व संघांचे पाचपेक्षा जास्त सामने झाले आहेत.

बांगलादेशने सहापैकी दोन सामने जिंकले तर तीन मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. ते पाचव्या स्थानावर आहेत. त्यांचे उर्वरित सामने अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. यात एक जरी पराभव झाला तरी त्यांना सेमिफायनल गाठता येणार नाही. उरलेले तीनही सामने जिंकल्यास त्यांना संधी मिळू शकते. मात्र, धावगती कमी असल्याने त्यांना 'जर.. तर'च्या खेळावर अवलंबून रहावं लागेल.

बांगलादेशने सहापैकी दोन सामने जिंकले तर तीन मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. ते पाचव्या स्थानावर आहेत. त्यांचे उर्वरित सामने अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. यात एक जरी पराभव झाला तरी त्यांना सेमीफायनल गाठता येणार नाही. उरलेले तीनही सामने जिंकल्यास त्यांना संधी मिळू शकते. मात्र, धावगती कमी असल्याने त्यांना 'जर.. तर'च्या खेळावर अवलंबून रहावं लागेल.

अफगाणिस्तानचे पुढचे सामने भारत, बांगलादेश, पाकिस्तान, वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध आहेत. पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध लढायचे आहे. तर दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.

श्रीलंकेने इंग्लंडवर विजयासह 6 गुण मिळवले. सेमीफायनल गाठायची असेल तर त्यांना पुढचे सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्यांचे उर्वरीत सामने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारताशी आहेत. वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडला पराभूत करून लंकेनं भारताला जणू इशाराच दिला आहे.

 सातव्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडिजचे 5 सामन्यात 3 गुण, या संघांनाही वर्ल्ड कपमध्ये आव्हान जिवंत ठेवणं कठीण आहे. वेस्ट इंडिजचे पुढचे सामने न्यूझीलंड, भारत, अफगाणिस्तान आणि लंकेविरुद्ध आहेत. अफगाणिस्तानचा पाचही सामन्यात पराभव झाला आहेत. तर पाकिस्तानने 5 सामन्यात 3 गुण आणि दक्षिण आफ्रिकेचे 6 सामन्यात 3 गुण झाले आहेत. या तीनही संघांचे वर्ल्ड कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

अफगाणिस्तानचा पाचही सामन्यात पराभव झाला आहेत. तर पाकिस्तानने 5 सामन्यात 3 गुण आणि दक्षिण आफ्रिकेचे 6 सामन्यात 3 गुण झाले आहेत. या तीनही संघांचे वर्ल्ड कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

वर्ल्ड कपची बाद फेरी 9 जुलैला सुरू होणार आहे. पहिली सेमीफायनल 9 जुलैला मँचेस्टरवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. तर अंतिम सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2019 07:57 AM IST

ताज्या बातम्या