कंपनीचा टार्गेट राहिला अपूर्ण, मालकानं कर्मचाऱ्यांना पाजलं मासे-कोंबड्यांचं रक्त

कंपनीचा टार्गेट राहिला अपूर्ण, मालकानं कर्मचाऱ्यांना पाजलं मासे-कोंबड्यांचं रक्त

एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना अतिशय क्रूर शिक्षा दिल्याचे वृत्त समोर आलं आहे. टार्गेट अपूर्ण राहिल्यानं कंपनीच्या मालकानं 12 हून अधिक कर्मचाऱ्यांना मासे आणि कोंबड्यांचं रक्त पिण्याची शिक्षा दिली.

  • Share this:

बीजिंग, 14 ऑगस्ट : खासगी कंपनी आणि टार्गेट हे आता समीकरणच झालं आहे. हे टार्गेट अगदी व्यवस्थित आणि ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याला भरघोस पगार तसंच पोस्टदेखील वाढवून मिळते. पण टार्गेट पूर्ण करू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढतोच शिवाय चांगल्या पगारवाढीलाही मुकावं लागतं. या टार्गेटच्याच भानगडीमुळे एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना अतिशय क्रूर शिक्षा दिल्याचे वृत्त समोर आलं आहे. टार्गेट अपूर्ण राहिल्यानं कंपनीच्या मालकानं 12 हून अधिक कर्मचाऱ्यांना मासे आणि कोंबड्यांचं रक्त पिण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा ऐकून कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडीओची जगभरात सध्या तुफान चर्चा सुरू आहे. हा प्रकार चीनमध्ये घडला आहे.

(वाचा :अशी बायको नको गं बाई! पत्नीनं पतीच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी)

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना बादलीतून मासे काढून खायला सांगत असल्याचं दिसत आहे. चिनी वृत्तपत्रानुसार, 4 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संबंधित कंपनीनं टार्गेट पूर्ण न करणाऱ्या 20 कर्मचाऱ्यांना शिक्षा सुनावत मासे आणि कोंबड्यांचं रक्त पिण्याची सक्तीदेखील केल्याचं दिसत आहे.

(वाचा :विकृतीचा कळस! गर्भवती तरुणीवर सामूहिक बलात्कार, 12 तासांत 11 वेळा केले अत्याचार)

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या शिक्षेनंतर कर्मचारी भविष्यात हीच चूक पुन्हा करणार नाहीत. तसंच अशा प्रकारच्या शिक्षेमुळे त्यांना उत्तम काम करण्याची प्रेरणादेखील मिळेल.  दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की खोटा? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे ही घटना सत्यात घडल्याचं कंपनीच्याच एका कर्मचाऱ्यानं मान्य केलं आहे. तसंच कर्मचाऱ्यांनी स्वतःहून यामध्ये सहभाग घेतल्याचंही त्यानं सांगितलं.

(वाचा : बहीण-भावाच्या नात्याला काळिमा.. अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाचा अत्याचार)

या प्रकरणाची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. पण यापूर्वी याहूनही कठोरातील कठोर शिक्षा दिल्याच्या घटना चीनमध्ये घडल्या आहेत.

======================================

पुराखाली गेलेल्या पुलावर तो धावला आणि अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग दाखवला, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading