जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांमध्ये 21 भारतातील, दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी

जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांमध्ये 21 भारतातील, दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी

दिल्ली (Delhi) जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांमध्ये तब्बल 21 शहरं भारतातील आहेत. आयक्यू एअर व्हिज्युअल ((IQAir AirVisual) ने वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 (World Air Quality Report, 2019) जारी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : दिल्ली (Delhi) जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांमध्ये तब्बल 21 शहरं भारतातील आहेत. आयक्यू एअर व्हिज्युअल ((IQAir AirVisual) ने वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2019 (World Air Quality Report, 2019) जारी केला आहे.

रिपोर्टनुसार, सर्वात जास्त दिल्लीशी जोडलं असलेलं गाझियाबाद शहर (Ghaziabad) जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे.  गाझियाबादमध्ये दरवर्षी पीएम 2.5 (PM 2.5) ची घनता वर्षाला सरासरी 110.2 आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, वर्षाला पीएम 2.5 हे 10 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असायला हवं. भारताची राजधानी दिल्ली जगातील प्रदूषित देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे चीनची राजधानी बीजिंगने (Bejing) हवेच्या गुणवत्तेत (Air quality) सुधारणा केली आहे. जगातील सर्वात 200 प्रदूषित शहरांच्या यादीतून बीजिंग बाहेर झालं आहे.

हेदेखील वाचा - कोरोनाचा धोका :  वुहाननंतर 'हा' व्हायरसचा केंद्रबिंदू, या देशात सर्वाधिक मृत्यू

भारतातील 98 टक्के शहरांमधील वायूप्रदूषण 20 टक्क्यांनी घटलं

देशाची राजधानी प्रदूषित शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणं ही भारतासाठी चांगली बातमी नाही, मात्र अशात भारतासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे 2018 ते 2019 मध्ये देशातील 98 टक्के शहरांमधील वायू प्रदूषण (Air Pollution) 20 टक्के कमी झालं आहे. तरीदेखील जगातील सर्वात प्रदूषित शहरं असलेल्या 10 मध्ये भारतातील 6 शहरांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात नवी मुंबईत सर्वात प्रदूषित

फक्त महाराष्ट्राचा विचार करता जगातील प्रदूषित शहरांमध्ये राज्यात नवी मुंबई (Navi mumbai) सर्वात प्रदूषित आहे. तर नागपूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, पुणे या शहरांची हवा संवेदनशील व्यक्तींसाठी अनहेल्दी आहे. तर चंद्रपुरातील हवेत सुधारणा झाली आहे.

हेदेखील वाचा - सुप्रीम कोर्टात स्वाइन फ्लू; 6 न्यायाधीशांना लागण, सर्वांचं होणार लसीकरण

दक्षिण आशियाची स्थिती सर्वात खराब

जगातील सर्वात प्रदूषित 30 शहरांमध्ये 27 शहरं भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशातील आहेत. बांग्लादेश जगातील सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत टॉपवर आहे. दक्षिण आशियात प्रदूषणाची स्थिती सर्वात खराब असली तरी 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये सुधार झाली आहे. जगातील 355 शहरांमध्ये या क्षेत्रात फक्त 6 शहरं अशी आहेत, जी वायू गुणवत्तेबाबत जागतिक आरोग्य संघटनेचं लक्ष्य गाठतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 06:45 PM IST

ताज्या बातम्या