Home /News /videsh /

तालिबानची तंबी: पाकिस्तान असो वा इतर कुणी, अफगाणिस्तानमध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको

तालिबानची तंबी: पाकिस्तान असो वा इतर कुणी, अफगाणिस्तानमध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) अंतर्गत प्रश्नात पाकिस्तानसह (Pakistan) कुठल्याही देशाचा हस्तक्षेप (interfere) खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा तालिबाननं (Taliban) दिला आहे.

    काबुल, 6 सप्टेंबर : अफगाणिस्तानच्या (Afghanistan) अंतर्गत प्रश्नात पाकिस्तानसह (Pakistan) कुठल्याही देशाचा हस्तक्षेप (interfere) खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा तालिबाननं (Taliban) दिला आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी अधिकृतपणे इतर देशांच्या सहभागाबाबतची भूमिका जाहीर करताना पाकिस्तानचा विशेष उल्लेख केला आहे. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या प्रमुखांनी अफगाणिस्तानला भेट दिल्यानंतर तालिबानकडून हा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानचा हस्तक्षेप नामंजूर पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचे प्रमुख फैज हामीद यांनी नुकतीच अफगाणिस्तानला भेट दिली. युद्धजन्य परिस्थितीत असणाऱ्या अफगाणिस्तानला सरकार स्थापनेत मदत करण्यासाठी हा दौरा असल्याचं पाकिस्तानकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात ज्या कारणासाठी फैज अहमद अफगाणिस्तानात आले, ते तालिबानला रुचलेलं नसल्याचं आंतरराष्ट्रीय संबंधातल्या अभ्यासकांचं मत आहे. भेटीमागचं खरं कारण आयएसआयचे प्रमुख फैज अहमद यांची अफगाणिस्तान भेट ही खरं तर केट्टा शूरा आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात सुरु असणाऱ्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर असल्याचं सांगितलं जात आहे. या दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न आयएसआय करत असून ही बाब तालिबानला अमान्य  असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अफगाणिस्तानातील दोन प्रमुख राजकीय शक्तींमध्ये समेट घडवण्यासाठी पाकिस्ताननं पुढाकार घेणे, ही बाब तालिबानला मंजूर नसून या प्रक्रियेपासून पाकिस्ताननं दूर राहावं, असं त्यांचं मत आहे. हे वाचा -OMG! असं कुठं असतंय व्हय? ही इमारत बघून व्हाल थक्क पाकिस्तान आणि तालिबानचे संबंध अफगाणिस्तानमध्ये सत्ता येण्यापूर्वी तालिबानचं मुख्यालय पाकिस्तानात होतं आणि अनेक तालिबानी नेते अमेरिकेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाकिस्तानमध्ये राहत असल्याचं वारंवार समोर आलं होतं. मात्र आता तालिबानच्या हाती सत्ता आल्यानंतर पाकिस्तानला आपल्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ करू द्यायला तालिबानची तयारी नसल्याचं दिसून येतंय. पाकिस्तानसाठीदेखील तालिबानची बदललेली भाषा हा एक धक्काच असल्याचं मानलं जात आहे. तालिबानच्या या वक्तव्याला पाकिस्तानकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Pakisatan, Taliban

    पुढील बातम्या