मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मुलं जन्माला घालणं हेच महिलांचं काम, मंत्री होणं नव्हे! तालिबाननं दाखवले खरे रंग

मुलं जन्माला घालणं हेच महिलांचं काम, मंत्री होणं नव्हे! तालिबाननं दाखवले खरे रंग

राज्यकारभार करणे (to run government) आणि मंत्रिपद (ministry) सांभाळणं ही महिलांची (Women) कामं नसून त्यांनी केवळ मुलं जन्माला (to birth to babies) घालण्याचं काम करावं, असा अजब सल्ला तालिबानच्या प्रवक्त्याने (Taliban spokesperson) दिला आहे.

पुढे वाचा ...

काबुल, 10 सप्टेंबर : राज्यकारभार करणे (to run government) आणि मंत्रिपद (ministry) सांभाळणं ही महिलांची (Women) कामं नसून त्यांनी केवळ मुलं जन्माला (to birth to babies) घालण्याचं काम करावं, असा अजब सल्ला तालिबानच्या प्रवक्त्याने (Taliban spokesperson) दिला आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाषा करणाऱ्या तालिबानने आता आपल्या विधानावरून घूमजाव केलं असून महिलांना सरकारमध्ये स्थान देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

महिलांचा आक्रोश

सरकारमध्ये महिलांना स्थान देण्याच्या मागणीसाठी अफगाणिस्तानातील महिला सध्या आंदोलन करत आहेत. तालिबाननं महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा शब्द पाळावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र तालिबाननं आपली भूमिका बदलली असून ते जुन्या भूमिकेवर परतले आहेत. महिलांचं खरं काम मुलं जन्माला घालणं आणि त्यांचं पालनपोषण करणं  हे असून सरकार सांभाळण्याचं काम त्या करू शकत नाहीत, असं तालिबानचे प्रवक्ते सैय्यद जकीरुल्लाह हाशमी यांनी म्हटलं आहे.

तालिबानची ताजी भूमिका

आपल्या अधिकारांसाठी आंदोलन करणाऱ्या महिला या काही अफगाणिस्तानातील सर्व महिलांचं प्रतिनिधीत्व करत नाहीत, असं तालिबाननं म्हटलं आहे. बहुतांश महिलांना घरात राहायला, मुलांना जन्माला घालायला आणि त्यांचं पालनपोषण करायलाच आवडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महिलांना मंत्रिपद देणं हे त्यांच्या गळ्यात लोढणं बांधल्यासारखं होईल, असं तालिबाननं म्हटलं आहे. त्यामुळे महिलांना सरकारमध्ये कुठलंही प्रतिनिधित्व मिळणार नसल्याचंच तालिबाननं स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - कबूल है! तालिबान करणार पाकिस्तानी चलनाचा स्वीकार

अफगाणिस्तानात महिला आक्रमक

महिलांना सरकारमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी, यासाठी महिला ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी हातात बॅनर घेऊन तालिबानच्या धमक्यांना आणि बंदुकांना न जुमानता त्या आंदोलन करत आहेत. त्यातील काही ठिकाणी तालिबानकडून त्यांच्यावर अत्याचार होत असून मारहाण आणि धक्काबुक्की झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Taliban