'या' देशात स्त्रिया दुसरा पुरुष आवडला तर मोडतात लग्न

पावणेचार हजाराच्या आसपास असलेली ही जमात आपल्या काही आधुनिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 05:48 PM IST

'या' देशात स्त्रिया दुसरा पुरुष आवडला तर मोडतात लग्न

पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवरच पाकिस्तानातील कलाशा नावाची सर्वात अल्पसंख्याक जमात राहते. पावणेचार हजाराच्या आसपास असलेली ही जमात आपल्या काही आधुनिक परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. जसं की जर या जमातीतील महिलांना दुसरा एखादा पुरूष आवडला तर त्या सरळ काडीमोड घेऊन दुसऱ्या पुरूषाशी लग्न करतात.

हा समुदाय खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल घाटाच्या बाम्बुराते,बिरीर आणि रामबुर क्षेत्रामध्ये राहतो. हा भाग हिंदू कुश पर्वतांनी वेढला आहे.

ही जमात साध्या घरामध्ये राहते. उत्सवात तर स्त्री-पुरूष एकसाथ मद्यपान पिऊन, बासरी आणि ड्रमच्या तालावर नृत्य करतात. अफगाण-पाकिस्तानी लोकांच्या भीतीमुळे तिथले लोक कायम स्वरक्षणासाठी बंदुका ठेवतात.

Loading...

या जमातीत बहुसंख्य स्त्रिया लघुउद्योगांच्या माध्यमातून पैसे कमावतात. त्यांनी तयार केलेल्या पर्स आणि रंगीबिरंगी माळा पुरूष मंडळी शहरात जाऊन विकतात. नटायची भारी शौक असलेल्या या महिला डोक्यावर खास टोपी आणि गळ्यात रंगीबिरंगी माळा घालतात.

वर्षभरात Camos, Joshi आणि Uchaw असे तीन सण तिथे साजरे होतात. याच सणासुदीच्या जल्लोषात तरूण-तरूणी एकमेकांच्या प्रेमात पडतात.

पाकिस्तानसारख्या मागासविचारांनी बुरसटलेल्या देशात या जमातील स्त्रियांना मनासारखा जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. एवढंच नाही तर लग्नानंतर जर त्या खूश नसतील तर त्या दुसरा साथीदार निवडू शकतात!

पण आधुनिक विचारांसोबतच इथेही काही कडक नियम आहेत. जसं की मासिक पाळीच्या वेळी त्यांना अपवित्र मानतात, यावेळी कुणालाही स्पर्श करता येत नाही. यासाठी त्यांना घराच्या बाहेर बनलेल्या बशाली नामक घरामध्ये ठेवतात जिथे भिंतीवर लिहिलेलं असतं ‘इसे छुना मना है’.

या जमातीच्या परंपरा खूप वेगळ्या आहेत. एखाद्याच्या मृत्यूनंतर इकडे शोक करत नाहीत तर क्रियाकर्माच्या वेळी हे लोक आनंदाने नाचत मद्यपान करतात. ते मानतात की, देवाच्या कृपेनेच लोकांचा जन्म-मृत्यू होतो.

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर सर्वात जास्त त्रास कलाशा जमातीवर झाला आहे. याआधी पर्यटनामुळे त्यांची रोजीरोटी चालायची. पण पर्यटक आता येत नाहीत. त्यामुळे त्यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आता नवी पिढीही दुसऱ्या देशात स्थायिक व्हायच्या विचारात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...