लॉस एंजिलिस, 09 एप्रिल : कोरोनामुळे जगभरात अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सर्वच देशांमध्ये कोरोनामुळे खबरदारी घेतली जात आहे. यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. ज्या गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्याच उपलब्ध आहेत. दरम्यान, अमेरिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्यात महिलेवर सुपरमार्केटमध्ये साहित्य चाटून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महिलेला ताब्यात घेतलं असून तिनं जवळपास 1 लाख रुपये किंमतीचं साहित्य चाटून पुन्हा जिथं होतं तिथं ठेवलं होतं.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एका सुपरमार्केटमध्ये हा प्रकार घडला. सुपरमार्केटमध्ये 1800 डॉलर किंमतीचं किराणा साहित्य तसंच इतर सामान चाटल्याचा आरोप महिलेवर करण्यात आला होता. याप्रकरणी तिला अटकही करण्यात आली आहे. साउथ लेक टाहोए पोलिस विभागाने याची माहिती दिली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, सॅफवे स्टोअरवर पोलिसांना बोलावण्यात आलं होतं. यामधये एका ग्राहकाने किराणा माल चाटून ठेवल्याचं सांगण्यात आलं. देशात कोरोनाने हाहाकार उडाला असतानाच या माहितीमुळे खळबळ उडाली. अधिकारी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा सॅफवेच्या एका कर्मचाऱ्याने संशयित महिलेनं केल्या कृत्याबद्दल सांगितलं.
हे वाचा : अडवलंच का? असा जाब विचारत तरुणांकडून पोलिसांना बेदम मारहाण: VIDEO
पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक तपास केला. त्यानंतर सांगितलं की, संशयित महिलेची ओळख पटली आहे. जेनिफर वॉकर असं त्या महिलेचं नाव आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे तिनं चाटलेलं साहित्य नष्ट करण्यात आलं.
हे वाचा : SALUTE! मुलासाठी आईनं लॉकडाऊनमध्ये दुचाकीवरुन केला 1400 किमीचा प्रवास