TikTok व्हिडीओ तरुणीसाठी ठरला वरदान; वेळीच झालं भयंकर आजाराचं निदान

TikTok व्हिडीओ तरुणीसाठी ठरला वरदान; वेळीच झालं भयंकर आजाराचं निदान

एका 22 वर्षीय तरुणीला टिकटॉकवर व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समजल्याचं तिने सांगितलं आहे.

  • Share this:

लंडन, 10 फेब्रुवारी : टिकटॉक बॅन होण्यापूर्वी भारतात याचे अनेक युजर्स होते. भारताशिवाय अनेक देशातही या प्लॅटफॉर्मने आपली एक चांगला सोर्स म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंग्लंडमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. एका 22 वर्षीय तरुणीला टिकटॉकवर व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समजल्याचं तिने सांगितलं आहे.

इंग्लंडच्या साउथ बर्डवेलमध्ये राहणारी केटी क्लेडन टिकटॉकवर एक व्हिडीओ पाहात होती, ज्यात ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शनबाबत माहिती देण्यात येत होती. बार्न्सले रुग्णालयात कम्युनिकेशन असिस्टेंट म्हणून काम करणाऱ्या केटी क्लेडनला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला ब्रेस्टमध्ये गाठ असल्याचं लक्षात आलं. तिने तात्काळ डॉक्टरांना याबाबत विचारलं असता, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं.

(वाचा - 18,21,986 रुपये! बराक ओबामांसाठी बनवलेल्या या शूजची होणार या किंमतीला विक्री)

केटीने याबाबत बोलताना सांगितलं की, व्हिडीओ पाहिल्यानंतर मला या गाठबाबत समजलं. त्यावेळी मला टेन्शन आलं नाही. त्यावेळी अगदी साधारण वाटणारी ही गोष्ट कॅन्सरचं असेल अशी जराही कल्पना नव्हती. माझ्या वयाच्या लोकांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, असं मला माहितच नव्हतं. पण मी मानसिकदृष्ट्या यासाठी तयार असल्याने अधिक त्रास वाटला नसल्याचं केटीने सांगितलं.

कोरोना काळातच मला कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली. परंतु कोरोनामुळे माझ्या ट्रिटमेंटमध्ये कोणताही अडथळा आला नाही. सध्या डॉक्टरांनी किमोथेरेपी करण्याचा सल्ला दिला असल्याचंही तिने सांगितलं. तसंच स्वत: कॅन्सरग्रस्त झाल्यानंतर तिने लोकांना याबाबत, या कॅन्सरच्या ट्रिटमेंटबाबत अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. तसंच अनेक तरुणींनाही ती ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: February 10, 2021, 3:49 PM IST

ताज्या बातम्या