S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

बायकोशी राडा पडला महागात, रागाच्या भरात बायकोने गिळल्या साडे चार लाखांच्या नोटा !

Sachin Salve | Updated On: May 8, 2017 10:03 PM IST

बायकोशी राडा पडला महागात, रागाच्या भरात बायकोने गिळल्या साडे चार लाखांच्या नोटा !

08 मे : बायकांना राग आला तर काय करतील याचा नेम नाही. घरात भांडण झाल्यावर कधी त्या आबोला धरून बसतात, कधी त्या तडक माहेरी निघून जातात...बरं प्रकरण जरा गंभीर असलं तर मग काय किचनमध्ये हाती जे लागेल त्याचा प्रसाद काही पतीदेवांना खावा लागतो...पण एकदा का रागाचा पार चढला तर मग चांगल्या चांगल्या पतीदेवांची काही खैर नसते. कोलंबियामध्ये एका पत्नीने रागाच्या भरात तब्बल 4.5 लाखांच्या नोटा गिळल्याची गमंतीशीर घटना घडलीये.

त्याचं झालं असं की, सँड्रा अल्मेडा असं या २८ वर्षीय महिलेचं नाव आहे. तिने आपल्या पतीला धडा शिकवण्यासाठी त्याने जमवलेली ७ हजार डॉलर भारतीय चलनात चार लाखांहूनही अधिक अशी रक्कम चक्क गिळली.

सँड्राचा पती हा तिला फसवून जमलेले पैसे घेऊन पळ काढणार होता. याची कुणकुण तिला लागताचा दोघांमध्ये कडाक्याचं भांडणं झालं. आणि रागाच्या भरात तिने 4.5 लाखांच्या नोटा खाऊन टाकल्यात. आता नोटा तर खाल्या पण यामुळे तिला हाॅस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. नोटा खाल्यामुळे तिच्या पोटात दुखू लागलं. तिला हाॅस्पिटलमध्ये दाखल केलं असता तिच्या पोटातून 57 नोटा बाहेर काढण्यात आल्या. हा प्रकार पाहुन डाॅक्टरही चक्रावून गेले. मग झालेला सगळा प्रकार समोर आला. डाॅक्टरांनी या नोटा पोलिसांच्या ताब्यात दिल्या असून आता हे प्रकरण कोर्टात गेलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2017 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close