40 डिग्री तापमानात कारच्या बोनटवर फ्राय केले मासे !

40 डिग्री तापमानात कारच्या बोनटवर फ्राय केले मासे !

मागच्याच वर्षी उन्हाळ्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एक व्यक्ती रस्त्यावर ऑमलेट बनवत होता. याचसंदर्भातले काही भन्नाट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • Share this:

चीन, ता. 07 जून : इंटरनेटवर आपण रोज अजब-गजब व्हिडिओ आणि फोटो पाहतच असतो. मागच्याच वर्षी उन्हाळ्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एक व्यक्ती रस्त्यावर ऑमलेट बनवत होता. याचसंदर्भातले काही भन्नाट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो चीनमधले आहेत. यात चीनची एक40 महिला  डिग्री तापमानात कारच्या बोनटवर मासे भाजत आहे.

कदाचित या फोटोंवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहेत. चीनच्या सगळ्यात प्रसिद्ध वृत्तपत्र 'पिपुल्स डेली'ने हे फोटो ट्विट केले आहेत. यात एक महिला मासे भाजताना दिसत आहे. कारच्या बोनटवर 5 मासे ठेवून ती त्यांना फ्राय करत आहे.

40 डिग्री सारख्या वाढत्या तापमानात ती मासे भाजण्याचा प्रयत्न करतेय. गंमत म्हणजे यातल्या एका फोटोत ती असंही दाखवत आहे की, ते मासे किती क्रिस्पी फ्राय झाले आहेत.

चीनच्या वृत्तपत्राने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटवर गंमतीशिर कमेंट्सही आल्या आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2018 04:11 PM IST

ताज्या बातम्या