मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

एका लिंकवर क्लिक करताच महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त, अत्यंत धक्कादायक प्रकरण

एका लिंकवर क्लिक करताच महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त, अत्यंत धक्कादायक प्रकरण

या धक्कादायक घटनेतून नागरिकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे.

या धक्कादायक घटनेतून नागरिकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे.

या धक्कादायक घटनेतून नागरिकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
थायलँड, 17 सप्टेंबर : ऑनलाइन फ्रॉड रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. टिव्ही आणि वृत्तपत्रातूनही यासंदर्भातील माहिती दिली जाते. मोबाइलवर फोन करून आणि मेसेज पाठवून लोकांना अलर्ट केलं जातं. यातून कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये असं सांगितलं जातं. काही लोक यातून अलर्ट होत आहेत. मात्र काहीजणं स्मार्टफोन वापरूनही स्मार्ट होत नसल्याचं दिसत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात वृद्ध महिलेने अनोळखी लिंकवर क्लिक केलं आणि तिच्या खात्यातून ३२ लाख रुपये उडाले. आणि अशा प्रकारे महिलेच्या आयुष्यभराची कमाई काही क्षणात गेली. ही घटना भारत नव्हे तर थायलँडची आहे. ६३ वर्षीय या महिलेचं नाव निस आहे आणि ही थायलँडमधील ट्रांगची राहणारी आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा कर्मचारी बनून लावला चुना महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तिला एका अज्ञान व्यक्तीने फोन केला. त्याने महिलेला सांगितलं की, तो रेव्हेन्यू विभागातून बोलत आहे. त्याने महिलेच्या मोबाइलवर लिंक पाठवून ती क्लिक करण्यास सांगितली. या लिंकवर क्लिक करून तुम्ही टॅक्सची राहिलेली रक्कम तपासू शकता. महिलेने लिंकवर क्लिक करताच तिच्या खात्यातील संपूर्ण रक्कम रिकामी झाली. जळगावात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी, 5 दिवसात तब्बल इतक्या दुचाकी जप्त उपचारासाठी ठेवले होते पैसे.... महिलेने सांगितलं की, खात्यात ३२ लाखांहून अधिक रुपये कापले गेले आणि आता केवळ ३ हजार रुपये शिल्लक आहेत. महिलेने सांगितलं की, लिंकवर क्लिक करताच स्क्रीन ब्लू कलर झाला. राजस्व विभागातील सदस्यांनी एक पेज सुरू केलं. ज्यावर काही सूचना दिली होती. त्यावर क्लिक करून संपूर्ण पैसे उडाले. महिलेचा फोन हँग झाला होता आणि त्यावर ती काहीच करू शकत नव्हती. तिने आपली सून आणि मुलीला याबाबत सांगितलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. यानंतर ती पोलिसांकडे गेली आणि केस दाखल केली. ते पैसे तिने उपचारासाठी ठेवले होते. मात्र आता ते पैसे शिल्लक राहिले नाही.
First published:

पुढील बातम्या