कॅलिफोर्नियामध्ये युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी

कॅलिफोर्नियामध्ये युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी

गोळीबार करणाऱ्या महिलेचा मृत्यू झालाय. बहुधा तिनं स्वतःला गोळी मारून घेतली, असं पोलिसांनी सांगितलंय. सिलिकॉन व्हॅलीमधला हा पहिलाच असा हल्ला आहे.

  • Share this:

04 एप्रिल : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार झालाय, यामध्ये 4 जण जखमी झाले. दोन जणांना गोळी लागली, आणि या दोघांची प्रकृती गंभीर आहे. गोळीबार करणाऱ्या महिलेचा मृत्यू झालाय. बहुधा तिनं स्वतःला गोळी मारून घेतली, असं पोलिसांनी सांगितलंय. सिलिकॉन व्हॅलीमधला हा पहिलाच असा हल्ला आहे.

गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अॅम्ब्युलन्स दाखल झाली. पोलिसांनी लोकांना घटनास्थळी न येण्याचं आवाहन केले. यानंतर काही काळ यु-ट्युबचे मुख्यालयदेखील बंद करण्यात आले आणि लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे कार्य सुरू करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घरगुती वादातून हा गोळीबार झाल्याचं म्हटलं जातंय.

First published: April 4, 2018, 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading