मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

18 चाकी ट्रकने कारला चिरडूनही महिला सुरक्षित! फोटो पाहून विश्वास बसणार नाही

18 चाकी ट्रकने कारला चिरडूनही महिला सुरक्षित! फोटो पाहून विश्वास बसणार नाही

या भिषण अपघाताचा (Accident) फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला सांगितलं की यात एक महिला सुरक्षित वाचली आहे. तर तुमचा विश्वास बसणार नाही. कारची अवस्था पाहून तर कोणी जिवंत असेल असं म्हणणार नाही. पण, हा चमत्कार घडला आहे.

  • Published by:  Rahul Punde

वॉशिंग्टन, 18 नोव्हेंबर : आतापर्यंत तुम्ही अपघातातून चमत्कारीकरित्या लोकं वाचलेली पाहिली असतील. मात्र, हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला सांगितलं की या अपघातातून एका महिला वाचली आहे. तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. ही घटना मंगळवारी वॉशिंग्टनच्या माउंट व्हर्नन येथील स्कॅगिट नदीच्या पुल I-5 वर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ही महिला तिच्या निसान अल्टिमा (Nissan Altima) वाहनात होती, तेव्हा तिच्या मागे असलेला सेमी ट्रक इतर वाहनांचा वेग कमी झाल्याने थांबू शकला नाही अन् निसान वर आदळला. ज्यामुळे कार पुढ ढकलली गेली. मात्र, पुढच्या ट्रकवर धडकण्यापूर्वी कार उलटली. यानंतर निसानला ट्रकने जवळजवळ पूर्णपणे चिरडले. या अपघातातून 46 वर्षीय महिला वाचणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही.

स्टेट ट्रॉपर रॉकी ऑलिफंट यांनी ट्विट केले की, "या अपघाताचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. चमत्कारासारखी फक्त किरकोळ दुखापती झाली... माझ्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत, मी यापूर्वी असे काहीही पाहिलं नाही"

ऑलिफंटने फॉक्स 13 ला सांगितले, "जेव्हा सैनिक आले, तेव्हा आम्हाला कारच्या आत कोणाचा तरी आवाज ऐकू येत होता. आत एक महिला होती जी स्वतः कारमधून बाहेर पडण्यास सक्षम होती. याचं वर्णन करणे शब्दांच्या पलीकडे आहे, कारण, इतक्या भिषण अपघातात चिरडलेल्या कारमधून एखादी व्यक्ती स्वतः चालत कसंकाय येऊ शकत?"

महिला अजूनही आत असल्याने गाडीच्या वरून सेमी ट्रक काढण्यासाठी पोलिसांनी टो ट्रक आणला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले.

या घटनेनंतर सोशल मीडिया अपघाताचे फोटो व्हायरल होत आहे. प्रत्येकजण याला चमत्कार असल्याचे सांगत आहे. अनेकांनी ट्विट करत यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

या अपघाताने I-5 पुलावरील सर्व वाहतूक बंद झाली होती. अधिकार्‍यांनी तत्परतेने दोन्ही दिशेच्या बाजू उघडल्या. अशाच एका घटनेत, सप्टेंबरमध्ये गुजरातमधील दाहोद येथे एका बाईकस्वाराला राज्य परिवहन बसने धडक दिल्याने तो थोडक्यात बचावला होता.

राज्य परिवहन बस वळण घेत असताना दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ब्रेक लावण्यापूर्वीच दुचाकीस्वाराला बसची धडक बसली. तो मोटारसायकलवरून पडला आणि बसखाली अडकला. सुदैवाने बस बंद थांबलल्यानंतर ती व्यक्ती बाहेर पडली. तो उभा राहिला आणि त्याची बाईक तपासायलाही गेला.

First published:

Tags: Accident, Road accident, Shocking accident