मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सात महिन्यांचा बाळाची ऑनलाईन विक्री? लोकांनी विचारले मजेदार प्रश्न

सात महिन्यांचा बाळाची ऑनलाईन विक्री? लोकांनी विचारले मजेदार प्रश्न

महिलेनं वस्तूऐवजी स्वतःच्या मुलाचाच फोटो ऑनलाईन विक्रीसाठी अपलोड केल्यामुळे (Woman upload photo of her baby by mistake along with photos of sofa for sale) एकच गोंधळ उडाला.

  • Published by:  desk news

लंडन, 1 डिसेंबर: महिलेनं वस्तूऐवजी स्वतःच्या मुलाचाच फोटो ऑनलाईन विक्रीसाठी अपलोड केल्यामुळे (Woman upload photo of her baby by mistake along with photos of sofa for sale) एकच गोंधळ उडाला. घरातील नको असलेली किंवा बदलायची एखादी वस्तू बाजारात नेण्याऐवजी ती (Online sale of things) ऑनलाईन विकणं अनेकजण पसंत करतात. त्यामुळे वस्तूची ने-आण करण्याचा त्रास आणि खर्चही वाचतो, शिवाय ज्याला ती वस्तू हवी असते तो येऊन वस्तू घेऊन जातो. मात्र अशा वस्तूंचे फोटो अपलोड करताना जर काही गडबड झाली, तर त्याचे नेमके काय परिणाम होतात, याची (Mistake in uploading photo) प्रतिची नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आली.

आईनं अपलोड केला मुलाचा फोटो

ब्रिटनच्या लीड्समध्ये राहणाऱ्या लूसी बॅटल या महिलेला तिच्या घरचा सोफा विकण्याची इच्छा होती. जुना सोफा विकून टाकावा आणि घऱबसल्या त्याचे चांगले पैसे मिळवावेत, असा विचार करून तिनं सोफा विकण्याचा निर्णय़ घेतला. जुना सोफा विकून नवा सोफा विकत घेण्याचा तिचा मानस होता. त्यासाठी तिने साहित्याची ऑनलाईन विक्री करणाऱ्या वेबसाईटवर सोफ्याचे फोटो अपलोड करण्याचा निर्णय घेतला.

फोटो अपलोड केले पण..

महिलेनं तिच्या घरातील सोफ्याचे सहा ते सात वेगवेगळे फोटो काढले आणि सोशल मीडियावर अपलोड केले. मात्र असं करताना त्यात चुकून एक फोटो तिच्या मुलाचा होता. तो फोटो इतर फोटोंसोबत सिलेक्ट झाल्यामुळे बेवसाईटवर अपलोड झाला आणि विक्री करण्यासाठीच्या वस्तूंमध्ये मुलाचा फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं.

हे वाचा- रेल्वे स्टेशन की भूत बंगला? सूर्यास्तानंतर येतात घुंगरांचे आणि रडण्याचे आवाज

लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया

या फोटोवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्या घरच्या मुलांसोबत हा मुलगा ऍडजस्ट होईल का, असा सवाल एकाने विचारला. तर आम्ही हे बाळ घेऊन जातो, पण तुम्ही आमचं बाळ घ्याल का, असा प्रश्न विचारत आणखी एका युजरने धमाल उडवून दिली. त्यानंतर आपल्याकडून चुकून आपल्या मुलाचा फोटो पोस्ट झाल्याचं सांगत आपलं आपल्या बाळावर निरतिशय प्रेम असल्याचं महिलेनं सांगितलं.

First published:

Tags: Britain, Viral news