• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • शॉपिंग मॉलमध्ये कपड्यांचं ट्रायल करताना महिला हादरली, शेअर केला धक्कादायक अनुभव

शॉपिंग मॉलमध्ये कपड्यांचं ट्रायल करताना महिला हादरली, शेअर केला धक्कादायक अनुभव

शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) कपड्यांचं ट्रायल करीत असताना एका महिलेला भयावह अनुभव आला.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर : कोरोनाचा (CoronaVirus) कहर हळूहळू कमी होत चालला आहे. त्यामुळे जगभरातील सर्व देशांमध्ये परिस्थिती पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मॉल, हॉटेल्स आणि थिएटरही पुन्हा सुरू झाली आहेत. अशातच अमेरिकेतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) कपड्यांचं ट्रायल करीत असताना एका महिलेला भयावह अनुभव आला. त्या ट्रायल रुममध्ये एक गुप्त कॅमेरा पाहून महिलेच्या पायाखालची जमिन सरकली. महिलेने आरोप केला आहे की, ट्रायल रूममध्ये कॅमेऱ्याच्या माध्यमातून महिलांचे अश्लील फोटो (Pornographic photos of women) कैद केले जात होते. महिलेने या कॅमेऱ्याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (woman trembled while trying on clothes in the shopping mall shared a shocking experience) एका रिपोर्टनुसार, अमेरिकेतील 27 वर्षीय नेली वालेंसिया कॅलिफॉर्नियातील विंटेज फेयर मॉलमध्ये कपडे खरेदी केल्यानंतर ट्रायल रूममध्ये गेली. Windsor स्टोरमध्ये कपड्यांचं ट्रायल ककताना जसं तिने आरशात पाहिलं तर तिचं लक्ष छुप्या कॅमेऱ्याकडे गेलं. जे पाहून तिला धक्काच बसला. हे ही वाचा-भीतीदायक घरांमध्ये झोपण्याची नोकरी; 1 मिनिटासाठी मिळणारा पगार ऐकून चक्रावून जाल हा कॅमेरा ट्रायल रूममध्ये छतावरील लाइट बल्बसोबत लावला होता. नेसीने याचा व्हिडीओ केला आणि आपल्या टिकटॉकवर शेअर केला. तिने हा सर्व प्रकार नेटकऱ्यांसोबत शेअर केला. जो व्हायरल झाला आहे. टिकटॉकवर शेअर केल्यानंतर 6,42,000 लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या घटनेबद्दल नेली वालेन्सिया हिने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, कपडे बदलत असताना माझं लक्ष कॅमेऱ्याकडे गेलं. त्यावेळी मी कपडे घातले नव्हते. मला खूप धक्का बसला. या सर्व प्रकारानंतर स्टोरच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, हा कॅमेरा आधीच्या ब्रँन्डचा असून तो बंद आहे. मात्र याबाबत नेमकी माहिती हाती लागलेली नाही.
  Published by:Meenal Gangurde
  First published: