मराठी बातम्या /बातम्या /विदेश /हे काय भलतंच! आपल्याच घरात फोनवर मोठ्याने बोलली म्हणून पोलिसांनी ठोठावला 27000 रुपयांचा दंड

हे काय भलतंच! आपल्याच घरात फोनवर मोठ्याने बोलली म्हणून पोलिसांनी ठोठावला 27000 रुपयांचा दंड

बरं ही महिला सार्वजनिक ठिकाणीसुद्धा नाही तर आपल्या घरातच फोनवर बोलत होती.

बरं ही महिला सार्वजनिक ठिकाणीसुद्धा नाही तर आपल्या घरातच फोनवर बोलत होती.

बरं ही महिला सार्वजनिक ठिकाणीसुद्धा नाही तर आपल्या घरातच फोनवर बोलत होती.

वॉशिंग्टन, 29 मे : काही लोक फोनवर (Talking on phone) इतक्या मोठ्याने बोलतात (Talking loudly on phone) की ते नक्की फोनवर बोलत आहेत की त्यांच्या समोर असलेल्या पण त्यांच्यापासून दूर असलेल्या एका व्यक्तीसोबत ते कळतच नाही. अनेकदा अशा व्यक्तींचा रागही येतो. त्यांना फोनवर हळू बोल असं सांगायचीही भीती वाटते किंवा सांगितलं तरी तात्पुरतं ते हळू बोलतात पुन्हा परिस्थिती जैसे थे. मग काय आपणच आपले कान बंद करून घेतो. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल एक महिला आपल्याच घरात फोनवर मोठ्याने बोलली म्हणून तिला चक्क पोलिसांनी हजारो रुपयांचा दंड ठोठावला (Woman fined for loudly talking on phone) आहे.

यूएसमधील डायमंड रॉबिनसन नावाच्या महिलेला फोनवर मोठ्याने बोलते म्हणून पोलिसांनी 385 डॉलर्स म्हणजे जवळपास 27 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आपल्याकडेही ध्वनीप्रदूषणासाठी तशी कारवाई केली जाते. पण सार्वजिनक ठिकाणीच एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आवाजावर बंदी आहे. तसंच सणासुदीच्या कालावधीत काही विशिष्ट वेळेपर्यंतच मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास परवानगी दिली जाते. पण फोनवर मोठ्यानं बोललं म्हणून दंड तोसुद्धा आपल्याच घरात बोलल्यावरही हे थोडं विचित्रच आहे नाही का?

हे वाचा - VIDEO - प्राण जाए पर चाय ना जाए! पोलिसापासून स्वतःला नाही, चहाला वाचवण्याची धडपड

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार डायमंड आपल्या घरातच ती फोनवर बोलत होती. फोन कानाला लावून बोलत बोलत घरातच इकडेतिकडे फिरतही होती. कधी घराच्या वरच्या बाजूला जात होती तर कधी खाली येत होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं हे पाहिलं आणि तिनं डायमंडला तंबी दिली. तू तुझा फोन सोडू शकतेस का, हळू आवाजात बोलू शकते का? पण डायमंडनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्यासमोरून चालती हो असं तिनं म्हटलं आणि आपलं फोनवरील बोलणं सुरूच ठेवलं.

त्यानंतर अवघ्यात ती मिनिटांतच इस्टपॉइंट पोलीस डायमंडच्या घरी पोहोचले तेव्हा तिनं आपल्यासोबत घडत असलेला प्रकार सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी फेसबुक लाइव्ह केलं. त्यावेळी पोलिसांनी तिच्या हातात दंडाची पावती दिली. आपण फोनवर बोलत असल्याने पोलिसांनी आपल्याला दंड ठोठावल्याचं तिनं आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये सांगितलं.  या दंडाच्या पावतीवर आजूबाजूच्या लोकांना त्रास दिल्याचं लिहिण्यात आल्याचं तिनं सांगितलं.

हे वाचा - Wrong side ने सायकल चालवली म्हणून महिला पोलिसाने अडवलं, आणि...थेट कोर्टात रवानगी

मी माझ्या घरात बोलत होते, यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होण्याचा प्रश्नच येत नाही. मी घराचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवू शकते, असं म्हणत तिनं दंड भरण्यास नकार दिला. दरम्यान आपण कृष्णवर्षीय असल्याने आपल्याला टार्गेट केलं जातं असल्याचा आरोपही तिनं केला आहे. ज्या महिलेनं पोलिसांना कॉल केला ती काही दिवसांपूर्वीच तिच्या शेजारी राहायला आली असल्याचं तिनं सांगितलं. डायमंडनं त्या महिलेलाही तिचं काय बिघडवलं याबाबत विचारणा केली पण महिलेनं या प्रकरणी काहीच उत्तर दिलं नाही.

First published:

Tags: Mobile, United States of America, World news