मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बापरे! सहकाऱ्याने तरुणीला इतकी घट्ट मिठी मारली की बरगड्यांची 3 हाडंच तुटली, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा

बापरे! सहकाऱ्याने तरुणीला इतकी घट्ट मिठी मारली की बरगड्यांची 3 हाडंच तुटली, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या सहकाऱ्याने तिला अतिशय घट्ट मिठी मारली, ज्यामुळे तिच्या बरगड्यांची तीन हाडं तुटली. याप्रकरणी महिलेनं सहकाऱ्याविरोधात कोर्टात धाव घेतली

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 18 ऑगस्ट : तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा अनुभवलं असेल की जवळच्या किंवा खास व्यक्तीला मिठी मारली की मनाला शांती मिळते आणि आधारही मिळतो. मात्र, आता याच मिठीने एका व्यक्तीला थेट कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडलं आहे. या प्रकरणात एका व्यक्तीने महिलेला इतक्या जोरात मिठी मारली की तिच्या छातीच्या बरगड्याची हाडंच तुटली. हे प्रकरण चीनचं असून चिनी महिलेनं तिच्या सहकाऱ्यावर खटला दाखल केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या सहकाऱ्याने तिला अतिशय घट्ट मिठी मारली, ज्यामुळे तिच्या बरगड्यांची तीन हाडं तुटली. याप्रकरणी महिलेनं सहकाऱ्याविरोधात कोर्टात धाव घेतली आणि तिच्या उपचारासाठी आलेल्या खर्चाकरता भरपाईची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2021 मध्ये घडली होती. चीनच्या हुनान येथे यूयांग शहरातील महिला आपल्या ऑफिसमध्ये एका सहकाऱ्याशी बोलत होती. इतक्यात दुसरा एक सहकारी तिथे आला आणि तिला जोरात मिठी मारली. घट्ट मिठी मारतच महिला वेदनेनं ओरडली. बराच वेळ तिला छातीमध्ये दुखत असल्याचं जाणवत होतं. मात्र तिने डॉक्टरकडे जाण्याऐवजी बरगड्यांवर गरम तेल लावलं आणि ती झोपून गेली. मात्र, या वेदना वाढतच गेल्याने पाच दिवसांनी ती रुग्णालयात गेली. बायकोनं मध्यरात्री पतीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकले उकळतं पाणी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण एक्स-रे रिपोर्टनुसार, महिलेची तीन हाडं तुटली होती. यात तिचं आर्थिक नुकसानही झालं कारण तिला कामावरुनही सुट्टी घ्यावी लागली. यासोबतच रुग्णालयाचा खर्चही भरपूर आला. बरं होताच ती त्या सहकाऱ्याकडे गेली, ज्याने तिला मिठी मारली होती आणि त्याला भरपाई मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने वाद घालायला सुरुवात केली आणि म्हणाला, की मिठी मारल्यामुळे हाडं तुटल्याचा काहीही पुरावा तुझ्याकडे नाही. काही काळानंतर, महिलेनं तिच्या सहकाऱ्यावर खटला दाखल केला आणि आर्थिक नुकसान भरपाईची विनंती केली. न्यायमूर्तींनी सहकाऱ्याला 10,000 युआन म्हणजेच 1.16 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने सांगितलं की, त्या पाच दिवसांत महिलेनं असं काहीही केलेलं आढळलं नाही, ज्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकतं.
First published:

Tags: Shocking

पुढील बातम्या