Home /News /videsh /

मुलीच्या इलाजासाठी अफगाणी महिलेवर मुलगा विकण्याची वेळ, किंमत ऐकून बसेल धक्का

मुलीच्या इलाजासाठी अफगाणी महिलेवर मुलगा विकण्याची वेळ, किंमत ऐकून बसेल धक्का

आपल्या मुलीवर इलाज (Woman sells her son for money to cure her daughter in Kabul) करण्यासाठी पैसे हवेत, म्हणून एका अफगाणि महिलेवर स्वतःच्या मुलाला विकण्याची वेळ आली.

    काबुल, 3 ऑक्टोबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून (Common man’s life becomes terrible in Taliban rule) सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. आपल्या मुलीवर इलाज (Woman sells her son for money to cure her daughter in Kabul) करण्यासाठी पैसे हवेत, म्हणून एका अफगाणि महिलेवर स्वतःच्या मुलाला विकण्याची वेळ आली. टोलो न्यूजनं दिलेल्या बातमीनुसार या महिलेनं मुलीवर इलाज करण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाला केवळ  355 डॉलरला म्हणजेच (woman sells son for $355) साधारण 25 हजार रुपयांना विकलं. कमालाची गरीबी आणि हतबलता तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अनागोंदी माजली आहे. लोक आपल्याकडे असलेल्या वस्तू विकून अन्नधान्य खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात कमालीचा दुष्काळ पडला असून अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आपल्या मुलांवर उपचार करण्यासाठी नागरिकांकडे पैसे नाहीत आणि मुलांना सुरक्षित निवारा देण्यासाठी घरंदेखील नाहीत. अनेक नागरिक सध्या विस्थापितांच्या छावण्यांमध्ये राहत असून प्रचंड हालअपेष्टा सहन करत आहेत. विकला दीड वर्षांचा मुलगा आपल्या 13 वर्षांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी महिलेने आपल्या दीड वर्षांच्या पोटच्या गोळ्याला काळजावर दगड ठेवत विकून टाकलं. मुलीचा जीव वाचवण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठलाही उपाय तिच्याकडे नव्हता. तालिबान सरकारनं जनतेला भलीमोठी आश्वासनं दिली असली, तरी प्रत्यक्षात मात्र स्थिती बिकट आहे. हे वाचा - भारताने ब्रिटनला चांगलाच धडा शिकवला, पाकिस्तानी मीडियाकडून मोदी सरकारचं कौतुक हिवाळ्याचं आव्हान अफगाणिस्तानमध्ये लवकरच हिवाळा सुरु होत आहे. नागरिकांना कडाक्याच्या थंडीत कुठे आणि कसं राहायचं, हा प्रश्न सतावतो आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर अनेक नागरिक विस्थापित झाले असून ते छावण्यांमध्ये राहत आहेत. त्यांच्याकडे पक्की घरं नाहीत आणि ती बांधण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे सरकार जोपर्यंत या नागरिकांच्या निवाऱ्याची सोय करत नाही, तोपर्यंत त्यांना हलाखीत दिवस काढावे लागत आहेत. या सगळ्यात कोवळ्या वयाच्या मुलांचे मात्र प्रचंड हाल होत असून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Mother, Taliban

    पुढील बातम्या