बस ड्रायव्हरने आरशात पाहिले कपलचे अश्लील चाळे, आणि...!

बस ड्रायव्हरने आरशात पाहिले कपलचे अश्लील चाळे, आणि...!

बसमध्ये अश्लील चाळे करत असलेल्या 31 वर्षीय महिला वंडर फ्रेंचला 26 नोव्हेंबरला न्यूकॅसलच्या कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:

न्यू साउथ वेल्स (ऑस्ट्रेलिया), 01 डिसेंबर: एका महिलेविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसच्या मागील सीटवर प्रियकरसोबत चाळे करत असल्यामुळे कोर्टाने एका महिलेविरोधात ही कारवाई केली आहे. तर मानसिक समस्या असलेल्यामुळे कोर्टाने प्रियकरावरील आरोप मागे घेतले असल्याची माहिती आहे.

बसमध्ये अश्लील चाळे करत असलेल्या 31 वर्षीय महिला वंडर फ्रेंचला 26 नोव्हेंबरला न्यूकॅसलच्या कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. पण कोर्टाच्या आदेशानंतरही महिला कोर्टातच गेली नाही. यानंतर कोर्टाने महिलेवरोधात थेट अटक वॉरेंटच जारी केलं आहे. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मी कोर्टात हजर राहणार असं फ्रेंचनं म्हटलं होतं. पण पोलीस कारवाईचा विरोध केल्यामुळे आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळे कोर्टाने आधीच फ्रेंचविरोधात दोषी करार दिला आहे.

फ्रेंच 29 मार्च 2019ला सकाळी 10 वाजेच्या सुमारास 24 वर्षांचा तरुण रयान जोन्ससोबत शारीरिक संबंध बनवताना पकडली गेली. या कपलचे अश्लील चाळे बस ड्रायव्हरला आरश्यातून दिसले. जेव्हा बस स्टॉपवर थांबली तेव्हा कपलला खाली उतरण्यास सांगितलं. पण त्यावेळीदेखील फ्रेंच आणि तिचा प्रियकर रयानने ड्रायव्हरसोबत गैरवर्तन केलं.

या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पण फ्रेंचने पोलीस कारवायांसाठी विरोध केला. त्यानंतर तिच्याविरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट पाठवण्यात आलं आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतरही फ्रेंच कोर्टात हजर राहिली नाही. त्यामुळे आता अटक झाल्यानंतर तिच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती कोर्टाकडून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2019 06:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading