मराठी बातम्या /बातम्या /विदेश /महिला शिक्षिकेनं घोड्यासोबत केलं आक्षेपार्ह कृत्य, गमवावी लागली नोकरी

महिला शिक्षिकेनं घोड्यासोबत केलं आक्षेपार्ह कृत्य, गमवावी लागली नोकरी

तिने तिच्या घोड्याला मारलेली लाथ ही अंतिमतः नोकरीवर मारलेली लाथ ठरली. तिला आपली नोकरी गमवावी लागली.

तिने तिच्या घोड्याला मारलेली लाथ ही अंतिमतः नोकरीवर मारलेली लाथ ठरली. तिला आपली नोकरी गमवावी लागली.

तिने तिच्या घोड्याला मारलेली लाथ ही अंतिमतः नोकरीवर मारलेली लाथ ठरली. तिला आपली नोकरी गमवावी लागली.

लंडन, 21 डिसेंबर: एका महिला शिक्षिकेनं (Female Teacher) तिच्या घोड्याला लाथ (Kicked her horse) मारल्यामुळे तिला आपली नोकरी गमवावी (Lost her job) लागली आहे. वास्तविक, ज्या व्यक्ती एखादा प्राणी पाळतात, त्यांचं त्या प्राण्यावर अतिशय प्रेम असतं. मात्र बऱ्याचदा असं काहीतरी घडतं ज्यामुळे प्राण्यांबाबत नागरिक आक्रमक होताना दिसतात. आपल्या घोड्याला लाथ घालणं एका महिला शिक्षिकेला चांगलंच महागात पडलं. तिने तिच्या घोड्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिच्यावर सर्व स्तरातून टीका व्हायला सुरुवात झाली.

अशी घडली घटना

ब्रिटनमधील एका शाळेत प्राथमिक शिक्षिका असणाऱ्या सारा मोल्ड्स नावाच्या महिलेनं घोड्याला लाथ मारल्याचा एक व्हिडिओ ब्रिटनमध्ये व्हायरल झाला. त्यानंतर प्राण्यांवर अत्याचार केल्याचा आरोप ठेवत तिला तिची नोकरी गमवावी लागली. तिच्या शाळेनं तिची हकालपट्टी करत घऱचा रस्ता दाखवला. डेली मेलच्या रिपोर्टनुसार सारा ही दोन मुलांची आई असून त्यांनी घरात एक घोडा पाळला आहे. काही दिवसांपूर्वी तिने घोड्याला लाथ मारली आणि हा प्रकार दूरून पाहणाऱ्या एका प्राणीमित्राने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सारावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठायला सुरुवात झाली.

शेजाऱ्याने केलं समर्थन

सारा ही अत्यंत सुस्वभावी महिला असून आतापर्यंत ती कायमच मैत्रीच्या भावनेनं सर्वांशी वागत असल्याचं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. तिच्या घोड्यासोबतही ती नेहमीच प्रेमाने वागत असे. कदाचित घोडा त्यावेळी उधळला असेल किंवा स्वैर झाला असेल म्हणून त्याला ताब्यात आणताना तिने हा प्रकार केला असण्याची शक्यता आहे. मात्र तिची बाजू ऐकून न घेता केवळ व्हिडिओच्या आधारावर तिला नोकरीवरून काढून टाकणं चुकीचं असल्याचं तिच्या शेजाऱ्यांचं मत आहे.

हे वाचा - आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणाला नवे वळण, भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक

येतायत धमक्या

प्राणीमित्र संघटनेच्या अनेक सदस्यांकडून सध्या साराला धमक्याही येत असून काही काळ ती घर सोडून अज्ञातवासात निघून गेली होती. जिवाच्या भितीनं हे पाऊल उचलावं लागल्याचं तिनं म्हटलं होतं.

First published:
top videos

    Tags: Britain, Job, School teacher, Teacher