Home /News /videsh /

पोटच्या गोळ्याला आईनं तब्बल 28 वर्षे डांबून ठेवलं; अवस्था पाहताच बसला धक्का

पोटच्या गोळ्याला आईनं तब्बल 28 वर्षे डांबून ठेवलं; अवस्था पाहताच बसला धक्का

तब्बल 28 वर्षांनी या मुलाची सुटका झाली आहे.

    स्टॉकहोम, 02 डिसेंबर : आपल्या मुलानं काही चूक केली तर पालक त्याला शिक्षा करतात. आई आपल्या मुलाला ओरडते, मारते, कधी कधी तर राहात ती मुलांना एका खोलीत कोंडूनही ठेवते. मात्र तिचा हा राग अगदी क्षणिक असतो.  काही वेळातच तिच्या मायेचा पाझर फुटतो आणि मुलांना कोंडून काही मिनिटंही झाली नसतात आणि ती आपल्या मुलांना रूममधून बाहेर काढते आणि त्यांना मिठीत घेऊन कुशीत घेऊन ढसाढसा रडते. मात्र याच आईच्या नात्याला काळिमा फासला आहे तो स्वीडनमधील (Sweden) एका महिलेनं. तिनं आपल्या मुलाला तब्बल 28 वर्षे तुरुंगात डांबून ठेवलं. पोलीस आणि माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी स्वीडनमधील मुलाला 28 वर्षांपासून कुलूप बंद ठेवण्याच्या संशयावरून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. स्टॉकहोमचे (Stockholm) पोलीस अधिकारी ओला ऑस्टरर्लिंग यांनी AFP शी बोलताना सांगितले की बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे आणि शारीरिक हानी पोहोचवण्याच्या गुन्ह्याखाली आईला अटक करण्यात आली आहे. अहवालात म्हटल्यानुसार त्या मुलाच्या आईने बारा वर्षाचा असताना त्याला शाळेतून बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर त्याला अपार्टमेंटमध्ये बंद ठेवलं होतं. साउथ स्टॉकहोममधील उपनगरातील अपार्टमेंटमध्ये बऱ्याच काळासाठी बंद करून ठेवलं. रविवारी एका अज्ञात नातेवाईकांना या गोष्टीबाबत समजलं. तेव्हा त्यांनी त्या मुलाला मदत करण्याचं ठरवलं. हे वाचा - OMG! हा कसला साइड इफेक्ट; औषध दिलं पोटदुखीचं आणि चिमुरड्यांच्या शरीरावर आले केस अज्ञात नातेवाईकांनी सांगितलं की, हा मुलगा वर्षानुवर्षे आम्हाला दिसलाच नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला सापडला तिथं लघवी, घाण आणि धूळ आढळून आली. त्यात सडलेला वास देखील येत होता. बऱ्याच वर्षापासून कोणीही ते घर स्वच्छ केलेलं नव्हतं. सर्व अस्ताव्यस्त पडलं होतं. अहवालात म्हटल्यानुसार, तो मुलगा जेव्हा सापडला तेव्हा त्याच्या पायावर अनेक जखमा झालेल्या दिसून आल्या. तसंच त्याला चालताही येत नव्हतं. त्याचे दात आणि बोलण्याची क्षमता सुद्धा कमकुवत झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात आता उपचार होत आहेत असे ऑस्टरर्लिंग यांनी सांगितलं. हे वाचा - लॉकडाऊनमध्ये खासदाराची SEX PARTY; पोलिसांनी धाड टाकताच धूम ठोकण्याचा प्रयत्न "मी धक्क्यात आहे परंतु याच वेळी मला दिलासा मिळाला आहे. मी वीस वर्षापासून या दिवसाची वाट पाहत होते कारण मला समजले होते की त्याची आई पूर्णपणे त्याच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवत आहे" असं त्या म्हणाल्या. आता माझ्या मनाला दिलासा मिळत आहे की, त्याला मी मदत केली आणि आता तो उत्तम आयुष्य जगू शकेल. दरम्यान या मुलाच्या आईवर लावण्यात आलेले आरोप तिनं नाकारले आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: World news

    पुढील बातम्या