मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

40 लाखांची नोकरी सोडून महिला बनली कामवाली बाई, दुसऱ्यांच्या घरी जाऊन करते काम

40 लाखांची नोकरी सोडून महिला बनली कामवाली बाई, दुसऱ्यांच्या घरी जाऊन करते काम

इतरांच्या घरी झाडू मारण्याची आणि साफसफाई करण्याची आवड जोपासण्यासाठी महिलेनं लाखो रुपयांची नोकरी सोडली.

इतरांच्या घरी झाडू मारण्याची आणि साफसफाई करण्याची आवड जोपासण्यासाठी महिलेनं लाखो रुपयांची नोकरी सोडली.

इतरांच्या घरी झाडू मारण्याची आणि साफसफाई करण्याची आवड जोपासण्यासाठी महिलेनं लाखो रुपयांची नोकरी सोडली.

  • Published by:  desk news

वॉशिंग्टन, 26 डिसेंबर: एका महिलेनं (Woman) आपली 40 लाख रुपये (40 lakh rupee) वार्षिक पगार असणारी नोकरी (Job) सोडली आणि झाडूवाली बाई (Sweeper) होण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाला आपलं आयुष्य सुखी-समाधानी असावं, असं वाटत असतं. त्यासाठी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी नोकरी पत्करावी आणि त्यातून अधिकाधिक पैसे कमवावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र एका महिलेनं आपली आवड लक्षात घेऊन लाखो रुपये पगाराची नोकरी सोडली आणि इतरांच्या घरी काम करण्याचा निर्णय घेतला. 

बँकेत करायची नोकरी

द सन वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार क्लेयर बर्टन नावाची महिला एका बँकेत कस्टमर सर्व्हिस रिप्रेजेंटेटिव्ह म्हणून काम करत होती. 2001 साली तिने आपल्या नोकरीला सुरुवात केली आणि तेव्हा तिचा पगार 15 लाख रुपये होता. त्यानंतर हळूहळू तिचा पगार वाढत गेला आणि तिचा पगार 40 लाखांवर पोहोचला. याच काळात तिची ओळख एका तरुणासोबत झाली आणि त्यांनी एकमेकांसोबत लग्न केलं. 

लग्नानंतर बदलली परिस्थिती

2003 साली त्यांनी लग्न केलं आणि संसाराला सुरुवात केली. 2017 सालापर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं. त्या वर्षी क्लेयरच्या वडिलांचं कॅन्सरनं निधन झालं आणि त्याच काळात तिचा पतीही तिला सोडून दिला. त्यामुळे खचलेल्या क्लेयरनं आपल्या आयुष्याचा गाडा तसाच ओढत ठेवला. मात्र ज्यावेळी 2019 साली तिच्या कंपनीतील अनेकांच्या नोकऱ्या जाऊ लागल्या, त्यावेळी मात्र तिने हाच योग्य संकेत मानला आणि स्वतःच नोकरीतून राजीनामा देत आपली आवड जोपासण्याचा निर्णय घेतला. 

हे वाचा -

सुरू केलं साफसफाईचं काम

क्लेयरला पहिल्यापासून घराची साफसफाई करण्याची आवड होती. त्याबाबत माहिती देणाऱ्या एका इन्स्टाग्राम ग्रुपवरून माहिती घेत तिनं याबाबतचं शिक्षण पूर्ण केलं. एका कंपनीकडे नाव नोंदवून काम मिळवलं आणि इतरांच्या घरी जाऊन साफसफाई करायला सुरुवात केली. सध्या तिच्याकडे सहा क्लाएंट असून ती आनंदानं आपलं आयुष्य जगत आहे. इतरांना मेल पाठवण्यापेक्षा इतरांच्या घरी जाऊन साफसफाई करण्यात आपल्याला अधिक रस वाटत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

First published:

Tags: Job, Woman