Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Shocking: डोळे तपासायला गेली महिला, रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन

Shocking: डोळे तपासायला गेली महिला, रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन

नेहमीप्रमाणे डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी गेलेल्या महिलेला (Woman shocked to see her medical test reports) अशी एक गोष्ट समजली ज्यामुळे तिला जबर धक्का बसला

नेहमीप्रमाणे डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी गेलेल्या महिलेला (Woman shocked to see her medical test reports) अशी एक गोष्ट समजली ज्यामुळे तिला जबर धक्का बसला

नेहमीप्रमाणे डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी गेलेल्या महिलेला (Woman shocked to see her medical test reports) अशी एक गोष्ट समजली ज्यामुळे तिला जबर धक्का बसला

  • Published by:  desk news

लंडन, 23 सप्टेंबर : नेहमीप्रमाणे डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी गेलेल्या महिलेला (Woman shocked to see her medical test reports) अशी एक गोष्ट समजली ज्यामुळे तिला जबर धक्का बसला. डोळ्यांना नीट दिसत नसल्याच्या (Problem of eye sight) तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला ब्रेट ट्यूमर असल्याचं निष्पन्न झालं (Woman detected with brain cancer) आणि दोन मुलींची आई असलेल्या महिलेला काय करावं, तेच कळेना.

डोळ्यांचा होता त्रास

ब्रिटनमधील सारा कार्डवेल या 46 वर्षांच्या महिलेला गेल्या काही दिवसांपासून नीट दिसत नव्हतं. कदाचित चष्मा लागला असेल असं वाटून तिनं स्थानिक डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी तिचे डोळे तपासून तिला चष्मा दिला. मात्र तरीही तिच्या दृष्टीत काही फरक पडला नाही. डॉक्टरांनी तिला वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगितल्या आणि वेगवेगळ्या काचा वापरून चष्मे बदलूनही पाहिले, मात्र त्यातील कशानेही तिची दृष्टी सुधारली नाही.  त्यामुळे डॉक्टरांनी तिला डोळ्यांच्या मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

टेस्टमध्ये समजला आजार

डॉक्टरांनी साराच्या डोळ्याच्या मागील भागाची तपासणी केली. सिटी स्कॅनिंग आणि इतर चाचण्या केल्यानंतर साराला त्यांनी काही प्रश्न विचारले. डोकं दुखतं का, इतर काही विचित्र अनुभव येतात का, असे प्रश्न विचारून डॉक्टरांनी लक्षणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साराच्या मेंदूमध्ये गाठ असल्याचं टेस्टमध्ये लक्षात आलं.

अवघड सर्जरी

काही दिवसांतच सारा डोळ्यांच्या डॉक्टरऐवजी न्यूरो सर्जनसमोर बसली होती. मेंदूतील ऑप्टिक नर्व्हवरच ही गाठ असल्यामुळे तिच्या दृष्टीवर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ऑपरेशन करून ही गाठ काढावी लागणार, हे समजल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

हे वाचा - पाकिस्तान आणि चीनचा डाव फसला, UN मध्ये तालिबानला प्रतिनिधित्व नाहीच

मुलींना आपण दोन दिवस बाहेर चालल्याचं सांगून तिने ऑपरेशन करून घेतलं. घरी आल्यावर तिला हळूहळू बरं वाटू लागलं. मात्र काही दिवसांत तिला दुसरा धक्का बसला. पुन्हा त्याच ठिकाणी ट्यूमर वाढल्याचं एमआरआय स्कॅनमधून दिसलं. त्यामुळं पुन्हा एकदा तिला ऑपरेशन करावं लागतं. तिसऱ्यांदा तिच्या डोळ्यातून झिणझिण्या येऊ लागल्या. त्यामुळे डॉक्टरांनी तिसऱ्यांदा तिचं ऑपरेशन केलं.

आता साराहला बरं वाटत असून दर वर्षी ती सर्व चाचण्या करून घेते. आपले अनुभव ती इतरांना सांगते आणि डोळ्यांच्या बाबतीतील कुठल्याही तक्रारीकडं दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देते.

First published:

Tags: Brain, Eyes damage, Surgery