मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बॉसला जाहीरपणे दिल्या शिव्या, तरीही मिळाली लाखोंची नुकसानभरपाई; वाचा सविस्तर

बॉसला जाहीरपणे दिल्या शिव्या, तरीही मिळाली लाखोंची नुकसानभरपाई; वाचा सविस्तर

कंपनीत बॉसला शिव्या घातल्या, अफवा पसरवल्या तर काय होईल, असं तुम्हाला वाटतं? एका महिलेला या गोष्टींचा प्रचंड फायदा झाल्याचं नुकत्याच एका घटनेत दिसून आलं आहे.

  • Published by:  desk news

सिडनी, 15 डिसेंबर: एका महिलेनंं (Woman) कार्यालयात तिच्या बॉसला (Boss) जाहीर शिव्या देऊनदेखील तिच्यावर कारवाई (Action) होण्याऐवजी फायदाच झाल्याची एक घटना समोर आली आहे. कुठल्याही कार्यालयात बॉस आणि कर्मचारी  (Boss and employee relation) यांचं नातं संघर्षाचंच असतं. काहीजण त्याविषयी खासगीत एकमेकांकडे तक्रार करत असतात. बॉसचा काटा कसा काढायचा याच्या काल्पनिक गोष्टीदेखील रंगवत असतात. मात्र जाहीरपणे कुणी बॉसला शिव्या घालत नाही किंवा कंपनीतील इतर अनोळखी कर्मचाऱ्यांसमोर बॉसला अपशब्द बोलताना दिसत नाही. असं करणं अनेकदा महागात पडू शकतं. मात्र एका महिलेला हेच कृत्य महागात पडण्याऐवजी फायदाच झाल्याची घटना समोर आली आहे.

बॉसला घातल्या शिव्या

ऑस्ट्रेलियातील एका कंपनीत एका महिलेचा तिच्या बॉससोबत वाद होता. त्यामुळे ऑफिसमधील जो कर्मचारी भेटेल, त्याच्यासमोर ती आपल्या बॉसला शिव्या घालत असे. बॉसची उणीदुणी काढणे, त्याला शिव्या घालणे, त्याच्याविषयी अफवा पसरवणे अशी कामं ती रोजच करत होती. एक दिवस याची खबर बॉसला लागली आणि त्याने कारवाई करत या महिलेला कामावरून काढून टाकलं. आपल्याला कामावरून काढून टाकल्याचं समजताच महिलेनं स्थानिक न्यायालयात धाव घेतली आणि कंपनीविरोधात दावा ठोकला.

हे वाचा - दोन मुलींनी घरात घुसून 30 वर्षीय तरुणाच्या केला विनयभंग, बीडमधील घटना

महिलेच्या बाजूनं निर्णय

या महिलेनं बॉसला शिव्या देणे आणि अफवा पसरवणे अशी कामं केल्याचा दावा कंपनीनं कोर्टात केला. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांना समोर आणून तो दावा सिद्धही केला. मात्र कंपनीचा दावा सिद्ध झाला असला तरी महिलेला नुकसानभरपाई देणं बंधनकारक असेल, असा आदेश कोर्टानं दिला. महिलेनं बॉसला शिव्या दिल्या असल्या किंवा अफवा पसरवल्या असल्या, तरी तिला नोटीस न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकणे, हा अन्याय असल्याचा निकाल कोर्टानं दिला. त्यामुळे तिचा एका महिन्याचा जो पगार होता, त्या हिशेबाने तिला नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे कंपनीला शिव्या घालूनही महिलेला सध्या दरमहा तिच्या पगाराएवढे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे.

First published:

Tags: Australia, Court, Woman