तिची छोटीशी चूक पडली महागात; एक बर्गर खाण्यासाठी मोजावे लागले 17 हजार

तिची छोटीशी चूक पडली महागात; एक बर्गर खाण्यासाठी मोजावे लागले 17 हजार

आपल्या आवडीचे पदार्थ खायला कोणाला नाही आवडत. हे पदार्थ खाण्यासाठी बरेच जण काहीही करण्याची तयारी दाखवतात हे आपण पाहिले असेल.

  • Share this:

लंडन, 16 जानेवारी: आपल्या आवडीचे पदार्थ खायला कोणाला नाही आवडत. हे पदार्थ खाण्यासाठी बरेच जण काहीही करण्याची तयारी दाखवतात हे आपण पाहिले असेल. पण लॉकडाऊनच्या काळात कडक नियम लागू असताना आपल्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी एखाद्याने शेकडो किलोमीटर प्रवास केला हे ऐकल्यावर कोणालाही आश्चर्यच वाटेल. अशीच एक घटना यूकेमध्ये (United Kingdom) घडलीये. एका तरुणीला बर्गर खाणं महागात पडलंय. या तरुणीने फक्त बर्गर खाण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात तब्बल 160 किलोमीटर प्रवास केला. यासाठी तिला दंड भरावा लागला.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे (Covid-19 New Strain) 5 जानेवारीपासून तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात कडक नियम लागू करण्यात आलेत. असं असताना सुद्धा लॉकडाउनच्या काळात बर्गर खाण्याची तीव्र इच्छा पूर्ण करण्यासाठी एका तरुणीन आपल्या बहिणीसह 160 किलोमीटर दुचाकीवरुन प्रवास केला. बर्गरसाठी एवढ्या लांब प्रवास करणं या बहिणींना महागात पडले असून नॉर्थ यॉर्कशायर (North Yorkshire Police) पोलिसांनी त्यांना 200 युरो म्हणजे साधारणपणे 17 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावला.

(हे वाचा- मुक्या जीवांना आगीतून वाचवण्यासाठी पोलिसांनी लावली जीवाची बाजी; Burning house मधील बचावकार्याचा थरारक VIDEO)

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणींनी मॅकडॉनल्ड्सचा (McDonald) बर्गर खाण्यासाठी लिंकनशायर ते स्कारबोरो असा प्रवास केला. लॉकडाउनच्या काळात बर्गर खाण्यासाठी 160 किलोमीटर प्रवास करणं अनावश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली.

युनायटेड किंग्डममध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे भितीचे वातावरण आहे. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आधीपेक्षा जास्त संसर्गजन्य असून याचा प्रसार झपाट्याने होत असल्याने यूकेमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

पोलीस दलाचे मुख्य निरीक्षक रचेल वूड यांनी सांगितले की, ‘नागरिकांना फिरण्याची इच्छा आहे हे समजू शकतं पण कोरोना महामारी संपल्यानंतर त्यांनी फिरावं. लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये थांबलेल्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. अशी लोकं राष्ट्रीय आरोग्य सेवेचे रक्षण करत आहेत आणि त्यांचे प्राण वाचवत आहेत.’ दरम्यान यूकेमध्ये 30 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झालीये. तर कोरोनामुळे 84 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

(हे वाचा-OMG! चक्क शरीराच्या आत उगवले मशरूम; पाहताच डॉक्टरही शॉक)

याठिकाणी लॉकडाऊनच्या काळात शाळा, दुकानं बंद करण्यात आली आहेत. नागरिकांना खाद्यपदार्थ, औषधांसह फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. लोक त्याच कामासाठी घराबाहेर पडू शकतात जी कामं घरामधून होऊ शकत नाहीत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाते. अशामध्ये उत्तर यॉर्कशायर पोलिसांनी या वीकेंडमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 70 हून अधिक नागरिकांविरोधात कारवाई केलीये.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 16, 2021, 7:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या