मराठी बातम्या /बातम्या /विदेश /2 दिवसात तालिबानचा खरा चेहरा उघड, भररस्त्यात महिलेला घातली गोळी

2 दिवसात तालिबानचा खरा चेहरा उघड, भररस्त्यात महिलेला घातली गोळी

अफगाणिस्तानमधील आमच्या राजवटीत महिलांचा आदर केला जाईल,' असा दावा तालिबानने (Taliban) मंगळवारी केला होता. दोन दिवसातच त्यांचे खरे रंग उघड झाले आहेत.

अफगाणिस्तानमधील आमच्या राजवटीत महिलांचा आदर केला जाईल,' असा दावा तालिबानने (Taliban) मंगळवारी केला होता. दोन दिवसातच त्यांचे खरे रंग उघड झाले आहेत.

अफगाणिस्तानमधील आमच्या राजवटीत महिलांचा आदर केला जाईल,' असा दावा तालिबानने (Taliban) मंगळवारी केला होता. दोन दिवसातच त्यांचे खरे रंग उघड झाले आहेत.

मुंबई, 19 ऑगस्ट : 'अफगाणिस्तानमधील आमच्या राजवटीत महिलांचा आदर केला जाईल,' असा दावा तालिबान (Taliban) या दहशतवादी संघटनेचा जबीबुल्लाह मुजाहीद याने मंगळवारच्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर दोनच दिवसात तालिबानचा चेहरा उघड झाला आहे. या दहशतवाद्यांनी त्यांचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. तालिबाननी महिलांना बुरखा घालण्याचा आदेश दिला होता. हा आदेश मोडल्याबद्दल एका महिलेला भररस्त्यात गोळी (Woman shot for not wearing burqa) घालण्यात आली आहे.

तालिबानचे सदस्य अफगाणिस्तानमधील (Afghanistan) रस्त्यांवर गाडी आणि बाईक घेऊन फिरत आहे. या सदस्यांच्या हातामध्ये तालिबानचा झेंडा आणि हत्यारं असतात. त्यांनी पुन्हा सत्ता मिळवल्यानं संपूर्ण देश संकटात सापडला आहे. शरिया कायद्याचे (Taliban Sharia Law) उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना तालिबान्यांकडून 'ऑन द स्पॉट' शिक्षा देण्यात येत आहे. याच शिक्षेच्या एका प्रकारात महिलेला बुरखा न घातल्याबद्दल भर रस्त्यात गोळी घालण्यात आली आहे.

अफगाणिस्तानच्या तखार प्रांतामधील (Takhar Province, Afghanistan) ही घटना आहे. तालिबानी दहशतवाद्यांना ही महिला रस्त्यावर बुरखा न घालता दिसताच त्यांनी तिला गोळ्या घालून ठार मारले. फॉक्स न्यूजनं (Fox News) रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिला आणि तिच्या जवळ उभे असलेले तालिबानी यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

काबूल (Kabul) न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी काबूल विमानतळावर (Kabul Airport) पोहोचणाऱ्या लोकांना देश सोडू देत नाहीत. देश सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर धारदार शस्त्रांनी (Attack) वार करत आहेत. त्यांच्यावर गोळीबार (Firing) केला जातो.

''आम्हाला इथून बाहेर काढा, तालिबान मारुन टाकेल'', रडत-रडत लहान मुलीची अमेरिकी सैन्याकडे विनंती, Watch Video

अफगाणिस्तानावर तालिबाननं कब्जा करताच देशात बुरख्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. तेथील महिला आणि मुली भविष्याबाबत काळजीत आहेत. अफगाणिस्तानमधील काही कुटुंब त्यांच्या मुलांना विदेशी सैनिकांच्या हाती सोपवत आहेत. त्यामुळे ते तालिबान्यांच्या तावडीतून वाचतील अशी त्यांना आशा आहे. या नागरिकांना तालिबानच्या तावडीत सापडण्यापेक्षा विमानातून खाली पडून मृत्यू येणे मान्य आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban