बर्मिंघम, 12 सप्टेंबर : जगभरात विविध प्रकारचे वर्ल्डरेकोर्ड हे बनत असतात. इंग्लंडमधील एका महिलेने देखील अशाच प्रकारचा एक वर्ल्डरेकोर्ड बनवला आहे. या महिलेने 3 मिनिटांपेक्षा कमी वेळात 10 डोनट्स खाण्याचा विक्रम केला आहे. इंग्लंडच्या बर्मिंघममधील 'लिह शटकेव्हर' या महिलेने कोरोनाच्या काळात मे महिन्यात 16 मे 2020 रोजी हा रेकॉर्ड केला आहे. मात्र यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे एकदाही ओठ न चाटता तिला हा विक्रम करायचा होता. तिने एकदाही ओठ न चाटता हा रेकॉर्ड पूर्ण केल्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सांगितले. नुकताच हा व्हिडीओ युट्युबवर पोस्ट झाला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत 82 हजार लोकांनी पहिले असून यामध्ये आपण पाहू शकतो कि, या महिलेने हा रेकॉर्ड 2 मिनिटे 53 सेकंदात पूर्ण केला आहे. यापूर्वी सर्वात जास्त म्हणजे 6 डोनट्स खाण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील जेसी फ्रीमन या व्यक्तीच्या नावे होता. 1 जुलै 2018 रोजी त्याने हा रेकॉर्ड करत 1 मिनिटामध्ये 6 डोनट्स खाल्ले होते.
हे वाचा-कुशल बद्रिके झाला भावूक, ठाणे पालिकेला केली कळकळीची विनंती, पाहा हा VIDEO
विविध कंपन्या देखील अशाच प्रकारे आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पदार्थ तयार करत असतात. नुकतेच एक ब्रिटनमधील कंपनीने 10.66 मीटर लांब puffcorn बनवला होता. क्रिकेटच्या खेळपट्टीचा अर्ध्या लांबीचा होता. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता कि, तो किती मोठा असेल. यासाठी त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद देखील झाली होती.
दरम्यान, अशाच प्रकारे अमेरिकेमधील बिल क्लार्क याने देखील एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने अवघ्या एका मिनिटात 29 कार प्लेट्स तोडण्याचा विक्रम केला आहे. याआधी त्याने 23 कार प्लेट्स तोडल्या होत्या. त्यानंतर आता त्याने स्वतःचाच रेकॉर्ड तोडत नवीन रेकॉर्ड स्थापित केला आहे.