Home /News /videsh /

धक्कादायक! 2 महिन्यांच्या चिमुकल्याचं आईनेच फाडलं पोट; भूत म्हणून खेचून बाहेर काढल्या आतड्या

धक्कादायक! 2 महिन्यांच्या चिमुकल्याचं आईनेच फाडलं पोट; भूत म्हणून खेचून बाहेर काढल्या आतड्या

फोटो सौजन्य - CEN

फोटो सौजन्य - CEN

बाळाच्या शरीरातून भूत काढण्याच्या नादात आईने स्वतःच त्याचा जीव घेतला.

    लंडन, 05 जुलै : आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. पण त्यासाठी तिने अंधविश्वासाचा आधार घेतला तर मुलांना वाचवण्याची तिची हीच धडपड मुलांच्याच जीवावर बेतू शकते. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बाळाच्या शरीरातून भूत काढण्याच्या नादात एका आईने स्वतःच आपल्या बाळाचा जीव घेतला आहे. भूताला बाळाच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी तिने चाकूने बाळाचं पोट फाडलं आणि त्यानंतर त्याच्या पोटातून आतड्या बाहेर काढल्या (Mother Kills Newborn). वेस्टर्न इक्वाडोरच्या गुआयाकिल शहरातील ही धक्कादायक घटना. 25 वर्षांच्या महिलेने आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला भूतापासून वाचवण्याच्या नादात स्वतःच त्याचा जीव घेतला आहे. स्वतःच्या पोटच्या गोळ्याच्या पोटावरच तिने चाकू फिरवला. हे वाचा - वडील शेवटच्या घटका मोजत असतानाच लेकीचं रुग्णालयात धक्कादायक कृत्य; तरीही होतंय कौतुक स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या दोन महिन्याचं बाळ भूतांच्या वशमध्ये आहे, असं तिला वाटत होतं. त्याच्या रडण्याला ती भुताचा आवज समजत होती. त्यामुळे बाळाच्या शरीरातून ते भूत बाहेर काढण्यासाठी तिने त्याचं आतडं काढून फेकण्याचा निर्णय घेतला. तिने किचनमध्ये फळं-भाजी कापण्यासाठी वापरला जाणारा चाकू घेतला आणि त्याच चाकूने बाळाचं पोट चिरलं. पोट फाडून त्यातून आतड्या खेचून बाहेर काढल्या. बाळाच्या आजीला ओरडण्याचा आवाज आला तेव्हा ती तिथं धावत आली.  नातवाचं पोट फाडलेलं होतं आणि लेकीच्या हातात चाकू असल्याचं तिने पाहिलं. तिने तात्काळ बाळाला उचललं आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली. पण बाळाला वाचवता आलं नाही,  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे वाचा - Oh no! BF ने घातली तब्बल 2 लाख रुपयांची अंगठी; दुसऱ्या दिवशीच GF वर बोट कापण्याची वेळ स्वतःच्या बाळाची हत्या केल्याच्या आरोपात या महिलेला अटक करण्यात आली. तिने असं का केलं हे विचारलं असता, बाळाच्या शरीरातून भूत असंच बाहेर काढता येतं असं ती म्हणाली. पोलिसांच्या मते, महिलेला मानसिक समस्या आहे. आता तिच्यावर उपचार केले जातील.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Small baby, World news

    पुढील बातम्या