Elec-widget

काहीही! या उंटाला घ्यावी लागणार आहेत अँटिबायोटिक्स कारण एकदा वाचाच..

काहीही! या उंटाला घ्यावी लागणार आहेत अँटिबायोटिक्स कारण एकदा वाचाच..

कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते... पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात हे उदाहरण पहिल्यांदा शिकवतात. पण ही उंटाची बातमी अजबच!

  • Share this:

फ्लोरिडा (अमेरिका), 26 सप्टेंबर : कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते... पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात हे उदाहरण पहिल्यांदा शिकवतात. जगभरात अभ्यासक्रमात हे Man bites dog... उदाहरण हमखास शिकवलं जातं. पण प्रत्यक्षात अशी बातमी कधी कुणा पत्रकारावर करायची वेळ आली असं उदाहरण विरळाच. त्याहून एक विचित्र बातमी अमेरिकेतून आली आहे.

एक बाई उंटाला चावली. बातमी एवढीच नाही तर या महिलेच्या चाव्यामुळे त्या उंटाला आता अँटिबायोटिक्स घ्यावी लागणार आहेत. कुत्रा चावला किंवा कुठला इतर प्राणी चावला तर माणसाला रीतसर उपचार घ्यावे लागतात. कुत्रा चावल्यानंतरची 14 इंजेक्शनची ट्रीटमेंट तर बरीच चर्चेच असते. पण माणूस चावला म्हणून उंटाला इंजेक्शन हे काही भलतंच! या महिलेच्या अंगावर उंट बसला. म्हणून ती या 600 पाउंडाच्या (272 किलो) प्राण्याला चक्क चावली.

हेही वाचा - Honey Trap : सगळ्यात मोठं सेक्स रॅकेट, 4 हजार Video, नेते, अधिकारी टार्गेटवर

अमेरिकेतल्या फ्लोरिडा प्रांतात लुइझाना इथे एक छोटं प्राणीसंग्रहालय आहे. टायगर ट्रक स्टॉपच्या या झूमध्ये ग्लोलिया आणि एडमंड लँकेस्टर हे दांपत्य आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला गेले होते. या कुत्र्याला उंटाने त्रास दिला, असं या दांपत्याचं म्हणणं आहे. पण प्राणीसंग्रहालयाच्या मते, या दांपत्याने उंटाला उगाच त्रास द्यायचा प्रयत्न केला. म्हणून हा पुढचा प्रसंग ओढवला.

हा व्हिडिओ पाहा - डोनाल्ड ट्रम्प यांनी WWFच्या मालकाला मारहाण करून केलं होतं टक्कल, VIDEO VIRAL

Loading...

खरं खोटं याचा तपास आता या प्रांताचे शेरीफ करत आहेत. पण उंटाला मात्र माणूस चावल्यामुळे तातडीने अँटिबायोटिक्सचे उपचार सुरू करण्यात आले आहेत. उंटाची तपासणी पशुवैद्यकीय तज्ज्ञाने केल्यानंतर त्याला ही ट्रीटमेंट देण्यात आली आहे.

-------------------------------------------

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: camel
First Published: Sep 27, 2019 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...