मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

दत्तक घेतलेल्या दोन मुलांविषयी हे सत्य समजताच महिलेला बसला सुखद धक्का

दत्तक घेतलेल्या दोन मुलांविषयी हे सत्य समजताच महिलेला बसला सुखद धक्का

30 व्या वर्षी कॅटीचे वैवाहिक जीवन (Married Life) संपुष्टात आल्यानंतर उर्वरित आयुष्यात आपण वेगळं काही करावे, असा तिला वाटत होतं.

30 व्या वर्षी कॅटीचे वैवाहिक जीवन (Married Life) संपुष्टात आल्यानंतर उर्वरित आयुष्यात आपण वेगळं काही करावे, असा तिला वाटत होतं.

30 व्या वर्षी कॅटीचे वैवाहिक जीवन (Married Life) संपुष्टात आल्यानंतर उर्वरित आयुष्यात आपण वेगळं काही करावे, असा तिला वाटत होतं.

वॉशिंग्टन, 25 ऑगस्ट : आपलं कुटुंब हसतं-खेळतं आणि सुखी असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. कोलोरॅडो (Colorado) येथील कॅटीला (Katie page) देखील आपलं असं कुटुंब (Family) असावं, असं वाटत होतं. आपली ही अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी कॅटीने दोन अनाथ मुलांना (Orphan Children) दत्तक (Adopt) घेतलं. मात्र एके दिवशी या मुलांविषयीचं सत्य तिला समजलं आणि आपलं विखुरलेलं आयुष्य खऱ्या अर्थानं एका चौकटीत सामावल्याची भावना कॅटीच्या मनात निर्माण झाली.

30 व्या वर्षी कॅटीचे वैवाहिक जीवन (Married Life) संपुष्टात आल्यानंतर उर्वरित आयुष्यात आपण वेगळं काही करावे, असा तिला वाटत होतं. त्यामुळे तिने तिची प्रथम नोकरी आणि नंतर राहतं घर बदललं. त्यानंतर तिनं दोन मुलांना दत्तक घेतलं. या दोन मुलांवर तिचं खूप प्रेम होतं. या दोन्ही मुलांचं एकमेकांशी खूप जवळचं नातं असल्याचं तिला एकेदिवशी समजलं.

भारतानं केली कमाल! 'या' क्षेत्रात इतिहास घडवत जागतिक महाशक्ती अमेरिकेलाही टाकलं मागे; जगात दुसरा क्रमांक

मुलगा आणि मुलीमुळं बदललं आयुष्य

2015 मध्ये कॅटी जीवनातील एकटेपणा दूर करण्यासाठी मुल दत्तक घेण्याचा विचार करत होती. त्यानंतर तिला 4 महिन्यांचं एक मूल दत्तक मिळालं. या बाळाला त्याची आई रुग्णालयातच (Hospital) सोडून गेली होती. कॅटीने या मुलाचं नाव ग्रेसन असं ठेवलं. त्यानंतर ती त्याचं संगोपन करु लागली. 11 महिन्यांनंतर ग्रेसन कॅटीचा अधिकृत मुलगा झाला. जिथून तिनं ग्रेसनला दत्तक घेतलं होतं, त्याच रुग्णालयात 4 महिन्यांच्या एका मुलीला कोणातरी सोडून गेल्याचं तिला समजलं. त्यानंतर या मुलीलाही दत्तक घेण्याचा निर्णय कॅटीनं घेतला. मात्र या मुलीच्या माहितीचे दस्तावेज पाहताना एक गोष्ट कॅटीला खूप खटकत होती.

अफगाणिस्तानचे उच्चशिक्षित असलेले माजी दळणवळण मंत्री करताहेत पिझ्झा डिलिव्हरी, तालिबानच्या भीतीनं सोडला देश

दोन्ही अनाथ मुलं होते भाऊ-बहिण

जेव्हा कॅटीने या मुलीच्या माहितीचे दस्तावेज पाहिले तेव्हा तिच्या आईची जन्मतारीख (Birth Date) यापूर्वी कुठेतरी पाहिल्याचे कॅटीला जाणवलं. त्यानंतर ग्रेसनचे कागदपत्रं पाहिली असता, त्याच्या आईची जन्मतारीख आणि या मुलीच्या दस्तावेजांवरील (Documents) तिच्या आईची जन्मतारीख एकच असल्याचं कॅटीच्या लक्षात आलं. त्यामुळे हे दोघंही सख्खे भाऊ-बहिण आहेत, असं कॅटीच्या लक्षात आलं. कॅटीनं याबाबत अधिक माहिती मिळवली आणि केअरटेकर एजन्सीशी संपर्क साधला. परंतु, एजन्सीच्या लोकांना कॅटीची ही गोष्ट पटली नाही. मात्र त्यानंतर या मुलांच्या आईचा शोध घेतला गेला असता, कॅटीने दत्तक घेतलेली ही दोन्ही मुलं सख्खे भाऊ-बहिण (Siblings) असल्याचे स्पष्ट झाले. ही मुलं सख्खी भाऊ-बहिण असल्याचं स्पष्ट झाल्यानं, आपल्याला खऱ्या अर्थाने एक परिवार मिळाला, या विचारानं कॅटीच्या आनंदाला पारावर उरला नाही.

First published:

Tags: America