नवऱ्याने धोका देऊ नये म्हणून चिनी बायका असं काही करतात; फक्त वाचूनच पुरते हादराल

नवऱ्याने धोका देऊ नये म्हणून चिनी बायका असं काही करतात; फक्त वाचूनच पुरते हादराल

आपल्या नवऱ्यांनी इतर महिलांसोबत संबंध ठेवू नयेत म्हणून चिनी महिला खतरनाक (Wives making husbands impotents) उपाय करतात.

  • Share this:

बीजिंग, 29 एप्रिल : आपला नवरा (Husband) किंवा बॉयफ्रेंडने (Boyfriend) आपल्याला सोडून इतर कोणत्याही महिलेकडे साधं पाहूही नये असंच प्रत्येक महिलेला वाटतं. त्याचंं दुसऱ्या कुणासोबत लफडं (Extra marital affairs) तर नाही ना, यावर सतत महिलांचा वॉच असतो. मग त्याच्या नकळत त्याचे खिसे, बॅग तपासणं असो किंवा मोबाईल तपासणं. महिला काय काय नाही करत. पण चीनमधील महिला असं काही करतात जे फक्त वाचूनच तुम्ही पुरते (Wives making husbands impotent) हादराल.

चीनमध्ये (China) महिला आपल्या नवऱ्यांनी आपल्याला धोका देऊ नये, दुसऱ्या महिलांसोबत संबंध ठेवू नयेत यासाठी त्या आपल्या नवऱ्यांना अशी औषधं (Medicines) देतात, ज्यामुळे ते नुपंसक (Impotence)  होतात.

एका व्यक्तीने ही पोस्ट लिहिली आहे. ज्याने अशी औषधं विकणाऱ्या ऑनलाइन दुकानांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, काही महिला आपल्या नवऱ्यांना डायथाइलस्टिलबेस्ट्रोल (DES) हे सिंथेटिक एस्ट्रोजेन औषध देतात. जेणेकरून ते  लैंगिक संबंध ठेवू शकणार नाहीत. म्हणजे दुसऱ्या महिलांसोबत ते शारीरिक संबंध ठेवणार नाही.

हे वाचा - धक्कादायक! Covid-19 काळात Google वर सर्च केले गेले स्त्रियांचा छळ करण्याचे मार्ग

Xiaoxiang Morning Herald ने दिलेल्या माहितीनुसार ही पोस्ट व्हायरल झाल्याचं वृत्त साऊथ चाइना मॉर्निग पोस्टने दिलं. या पोस्टच्या स्क्रिनशॉटमधून समजलं की काही महिलांनी या दाव्याबाबत सांगितलं होतं. याचे चांगले परिणामही पाहायला मिळाल्याचं त्या म्हणाल्या. "नवऱ्याला औषध दिल्यानंतर त्याचा प्रभाव दिसण्यासाठी जवळपास दोन आठवडे लागले. आता माझा नवरा घरी खूप चांगल्या पद्धतीने आहे, असा अनुभव एका महिलेने मांडला. तर एक महिला म्हणाली, "माझ्या नवऱ्याने हे औषध घेतल्यानंतर लैंगिक आजारांचा सामना करावा लागला आणि का असं विचारू लागला". तिने आपल्याला दोष देऊ नको, आपण हे कुटुंबासाठी केलं आणि ते करत राहणार असं त्याला सांगितलं.

Xiaoxiang Morning Herald एका रिपोर्टरने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर DES औषध शोधलं. काही दुकानं सापडली जे या औषधाची जाहिरात करत नव्हते पण नवऱ्यांना हे औषध दिलं जाऊ शकतं, असं त्यांचं म्हणणं होतं. एका विक्रेत्याने आपण DES विकत राहणार असं म्हटलं. अनेकांनी हे औषध खरेदी केलं आहे. महिन्यातून कमीत कमी शंभर लोक तरी हे औषध खरेदी करतात असं विक्रेत्याने सांगितलं. 50 ग्रॅम. 100 ग्रॅम आणि 200 ग्रॅम औषधाची किंमत अनुक्रमे 90 युआन, 170 युआन आणि 320 युआन म्हणजे 1 हजार रुपये, 2 हजार रुपये आणि साडेतीन हजार रुपये आहे.

हे वाचा - एक्स बॉयफ्रेंडने ब्लॉक केल्याने भडकली महिला; बदला घेण्यासाठी केला नको तो प्रताप

Xiaoxiang Morning Herald च्या रिपोर्टरने इतर दुकानातून माहिती घेतली, तिथं हे औषध उपलब्ध नव्हतं. हे औषध प्राण्यांसाठी वापरलं जात असल्याचं एका दुकानदाराने सांगितलं. हे औषध म्हणजे एक गंधहीन पांढरी पावडर असते. जी पाण्यात मिक्स करता येते, अशी माहिती दुकानदाराने दिली.

हुनानच्या सेकंड पिपल्स हॉस्पिटमधी फार्मासिस्ट लुओ मो यांनी सांगितलं, DES प्रामुख्याने महिलांसाठी एस्ट्रोजेनची कमी आणि अनियंत्रित मासिक पाळीसाठी वापरण्यात आलं होतं. पण आता एस्ट्रोजेनसाठी इतर नैसर्गिक पर्याय उपलब्ध झाल्याने याचा वापर थांबवण्यात आला.  हे औषध घेतल्याने पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ घेतल्याने हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं आणि पचनक्रियाही बिघडी शकते. या औषधामुळे लैंगिक अवयवांचा कॅन्सरही बळावू शकतो. त्यामुळे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घ्यायला हवं.

Published by: Priya Lad
First published: April 30, 2021, 9:14 AM IST

ताज्या बातम्या