न्यूयॉर्क, 25 ऑगस्ट : अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीसोबत पोलिसांच्या हिंसाचाराचे नवीन प्रकरण समोर आले आहे. रविवारी विस्कॉन्सिनच्या (Wisconsin) कॅनेशा शहरात दोन पोलिसांनी कृष्णवर्णीय जेकब ब्लेकवर (Jacob Blake) त्याच्या मुलांसमोर गोळी झाडली. पोलिसांनी आपल्या निवेदनात ब्लेक यांच्याकडे शस्त्र होती, त्यामुळे गोळ्या झाडल्या, असे सांगितले. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ब्लेककडे शस्त्र नसल्याचे दिसतआहे. पोलिसांनी जेकबच्या पाठीवर 7 गोळ्या झाडल्या.
गोळी लागल्यानंतर जेकबला रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याची प्रकृती आता ठिक असून. जिवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र पोलिसांच्या या कौर्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेकबचा वकील बेन क्रंपया यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे.
वाचा-…आणि कुत्र्याच्या पट्ट्यावर पाय देताच झाला महिलेचा मृत्यू! पाहा CCTV VIDEO
Shot SEVEN times in the back by a cop… Is #JacobBlake the next George Floyd?
STORY: https://t.co/383ckZKJZM pic.twitter.com/4JXBtCMhA9
— RT (@RT_com) August 25, 2020
वाचा-एका सेकंदानं हुकला मृत्यू! स्पीडमध्ये अगदी जवळून गेली महिंद्रा व्हॅन अन् तो...
यात पोलिसांच्या एसयूव्हीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी जेकबवर गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. या प्रकरणानंतर संतप्त लोकांनी कॅनोशा कोर्टहाऊससमोर निदर्शने केली. निदर्शनं तीव्र झाल्यानंतर कॅनोशामध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अमेरिकेत गेल्या दोन महिन्यांतील कृष्णवर्णीयांवर पोलिसांनी गोळीबार केल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 12 जून रोजी, जॉर्जियामधील अटलांटामध्ये अटकेच्या काही धिकाऱ्यांनी 27 वर्षीय राशर्ड ब्रुक्सला गोळ्या घातल्या होत्या.
BREAKING: Rioters corner police with assault weapons in Wisconsin
— Drew Hernandez (@livesmattershow) August 24, 2020
वाचा-...आणि बघता बघता अख्खा डोंगर खचला, पाहा थरारक LIVE VIDEO
चौकशी सुरू, अद्याप निलंबन नाही
सध्या पोलिसांनी प्राथमिक तपासणी दरम्यान आरोपी पोलिसांना निलंबित करण्यास नकार दिला आहे. कॅनोशा पोलिसांनी विस्कॉन्सिन गुन्हे अन्वेषण विभागाला चौकशी करण्यास सांगितले आहे. या तपासणीचे नेतृत्व कॅनोशचे काऊन्टी डेप्युटी शेरिफ करतील. त्याचा अहवाल जिल्हा अॅटर्नी मिशेल डी ग्रेव्हलीला सादर केला जाईल आणि त्यानंतर या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या या पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.