नवी दिल्ली, 25 जून : जगभरात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण वेगानं पसरत आहे. 180 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. येत्या 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटींवर पोहोचणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.
या आकडेवारीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरॉस अधनॉम म्हणाले की, पुढच्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या एक कोटींवर पोहोचू शकते. हे संपूर्ण जगासाठी रिमांइड करण्याची बाब आहे. कोरोनाची लस आणि औषधे यावर संशोधन चालू आहे. लस कधी येणार याबाबत अद्याप काही सांगता येत नाही मात्र हा वेगानं पसरणारा संसर्ग कसा रोखता येईल आणि शक्य तेवढ्या लोकांचे जीव कसे वाचवता येतील यावर विचार करणं गरजेचं आहे.
हे वाचा-
मुंबईतलं हे हॉस्पिटल बनलं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सेंटर, वाचा धक्कादायक रिपो
हज यात्रेसंदर्भात घालण्यात आलेले निर्बंध हे संसर्गाचा विचार करून आहेत. हा निर्णय जोखीम आणि धोका लक्षात घेऊन करण्यात आला. दुसरीकडे अमेरिकेत वेगानं कोरोनाचा संसर्ग वाढत आहे आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे ही सर्वात चिंतेची बाब आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका सर्वाधिक आहे.
या सगळ्यात ब्रिटनने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेली व्यवस्था बरी असल्याचं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ही योजना सर्व देशांना लागू करण्याबाबत विचार करावा. वर्ल्डोमीटरच्या म्हणण्यानुसार सध्या जगात एकूण रुग्णांची संख्या 93 लाख 53 हजार 735 असून त्यामध्ये 4 79 हजार 805 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 38 लाखहून अधिकक अॅक्टिवेट केसेस आहेत. त्यापैकी 58 हजार अत्यावस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.