जर्मनीत मर्कल चौथ्यांदा निवडून येणार?

जर्मनीत मर्कल चौथ्यांदा निवडून येणार?

गेल्या १७ वर्षांपासून त्या जर्मनीच्या अध्यक्षपदावर आहेत. २४ सप्टेंबरला जर्मनीत निवडणुका आहेत, आणि यावेळीही त्यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मर्कलच आहेत.

  • Share this:

अमेय चुंभळे, प्रतिनिधी

18 सप्टेंबर:राजकारणात आलं की हे ध्यानात ठेवावं लागतं की पैसा कमवणं हे महत्त्वाचं नसतं. हे शब्द आहेत जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्कल यांचे. गेल्या १७ वर्षांपासून त्या जर्मनीच्या अध्यक्षपदावर आहेत. २४ सप्टेंबरला जर्मनीत निवडणुका आहेत, आणि यावेळीही त्यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मर्कलच आहेत.

मर्कल यांच्या या कार्यकाळातही अर्थव्यवस्था चांगली आहे. बेरोजगारी ११.२ टक्क्यांवरून ३.८ टक्क्यांवर आलीय. गाड्या आणि इतर महागड्या वस्तूंचा चांगला खप होतोय. ब्रेक्झिटनंतर बसलेल्या हादऱ्यांचा परिणाम जर्मनीवर तुलनेनं कमी झाला आहे. तिथला समाज जास्त उदारमतवादी झालाय. समलैंगिकांचे विवाह जर्मनीत आता कायदेशीर झाले आहेत.

समलैंगीक विवाहांचा मुद्दा महत्वाचा आहे. युरोपच्या अनेक देशांमध्ये समलैंगीक विवाहांना परवानगी आहे. इतके दिवस ती जर्मनीत नव्हती. मर्कल यांच्या पक्षाचाही त्याला विरोध होता. मग मर्कल बाईंनी शक्कल लढवली. सार्वमत घेतलं. लोकांचा कल होता समलैंगी विवाहांच्या बाजूनं मत दिलं. मर्कल यांनी स्वतः लक्ष घालून तिथल्या संसदेत कायदा मंजूर करून घेतला. यामुळे त्यांची तरुणांमधली लोकप्रियता कमालीची वाढली. समलैंगीक नागरिकांचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्यांच्या बाजूचे हक्क तरुणांना नेहमीच भावतात.

जर्मनी ही एकेकाळची जगातली महासत्ता. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी हे बिरूद गमावलं. पण गेल्या काही वर्षात चित्र बदलतंय. युरोपिअन महासंघाचं नेतृत्व आज जर्मनी करतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनाही चार शब्द सुनवायला मर्कल बाई पुढेमागे पाहत नाहीत. ब्रेक्झिटच्या वेळीही ब्रिटन नाही तर नाही, आपलं काही अडत नाही, अशी स्पष्ट भूमिका बाईंनी घेतली. त्यामुळेही त्यांची प्रतिमा चांगलीच उंचावली. याचाही फायदा मर्कलना निवडणुकीत होणार हे नक्की.

पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या त्यांना तितक्या जमल्या नाहीत. पायाभूत सुविधांवर जर्मन सरकारनं खर्च करणं कमी केलंय. दुसरं म्हणजे, इंटरनेटचा स्पीड जर्मनीत तुलनेनं कमी आहे. खरं वाटणार नाही, पण हा निवडणूकीत एक मुद्दा झालाय. तिसरा मुद्दा असा की जर्मनीत वयस्कर लोकांची संख्या लक्षणीय आहे. पण काही महिन्यांपूर्वी निवृत्तीचं वय ६५ वरून ६३वर आणण्यात आली. यावरून मर्कल यांच्यावर बरीच टीका झाली. ते काहीही असलं, तरी मर्कल पुन्हा निवडून येणार हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 02:49 PM IST

ताज्या बातम्या