मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

नवीन सरकारमध्ये अफगाण महिलांना स्थान मिळणार का? तालिबानचा मोठा निर्णय

नवीन सरकारमध्ये अफगाण महिलांना स्थान मिळणार का? तालिबानचा मोठा निर्णय

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं तेथे आपलं सरकार (Taliban Government in Afghanistan) स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. येथील सरकार कसं असेल? याबाबत मोठी घोषणा तालिबाननं केली आहे.

  • Published by:  News18 Desk

काबूल, 17 ऑगस्ट: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं तेथे आपलं सरकार (Taliban Government in Afghanistan) स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक माफी देऊन त्यांना मंगळवारी कामावर परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता तालिबाननं आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामध्ये तालिबाननं म्हटलं आहे की, त्यांचं सरकार पूर्णपणे इस्लामिक असेल. पण त्यामध्ये महिलांचाही समावेश (Afghan women will get place in taliban government)असेल. तालिबाननं म्हटलं की, 'महिलांवर होणार अन्याय थांबवण्याचाही आमचा हेतू आहे.'

याबाबतची माहिती इस्लामी अमिरात संस्कृती विभागाचे सदस्य ईनामुल्लाह समनगनी यांनी मंगळवारी अफगाणिस्तानतील सरकारी टीव्हीवर दिली आहे. ते म्हणाले की, 'महिलांना त्रास व्हावा असं इस्लामी अमिरातीला बिलकुल वाटत नाही.' तालिबान संघटना अफगाणिस्तानसाठी इस्लामिक अमिरात हा शब्द वापरत आहे.

हेही वाचा-देश सोडण्यासाठी पायीच निघाले नागरिक; Afghanistan मधील विदारक चित्र

समनगनी यांनी सांगितलं की, " तालिबान सरकारची रचना कशी असेल, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालं नाही. परंतु अनुभवाच्या आधारावर संपूर्ण इस्लामिक नेतृत्वाची निवड केली जाणार आहे. यात सर्व पक्षांना सामील केलं जाणार आहे. सध्या सरकार स्थापनेचा अजेंडा ठरवला जात आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच जाहीर केला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांचं भवितव्य काय? तालिबानची मोठी घोषणा

तालिबाननं मंगळवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 'सर्वसमावेशक माफी' जाहीर केली आहे. तालिबाननं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना माफीची घोषणा केली जात आहे. त्यामुळे सर्व सरकारी कर्मचारी मंगळवार पासून नेहमीप्रमाणे कामावर रुजू होऊ शकतात. त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नाही. तुमच्या जीवाला काहीही धोका पोहोचवला जाणार नाही.

First published:

Tags: Afghanistan, Taliban