S M L

जर्मनीत रानडुक्कर बॅंकेत घुसले; चार जखमी 

यातील एका रानडुक्कराने एका बॅंकवर केलेल्या हल्ल्यात चार लोक गंभीर जखमी झाले होते. त्या रानडुक्करास ठार मारण्यात अखेर पोलीसांना यश आले तर एक रानडुक्कर फरार झाले.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 23, 2017 02:27 PM IST

जर्मनीत रानडुक्कर बॅंकेत घुसले; चार जखमी 

हेड,23 ऑक्टोबर: जर्मनीतील हेड शहरात दोन रानडुक्करांनी  दोन दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला. यातील एका रानडुक्कराने एका बॅंकवर केलेल्या हल्ल्यात चार लोक गंभीर जखमी झाले होते. त्या रानडुक्करास ठार मारण्यात अखेर पोलिसांना यश आले तर एक रानडुक्कर फरार झाले.

सकाळी नऊच्या सुमारास हेड शहराच्या रस्त्यांवर ही रानडुक्करं फिरताना दिसत होती. या रानडुक्करांचं वजन तब्बल 70 किलो होतं. त्यातील  एक रानडुक्कर चष्म्याच्या दुकानात शिरलं. तेथील  मालाची या रानडुक्कराने नासधूस केली.  नंतर तिथून हे एका बॅंकेतही  शिरलं. तिथे रानडुक्कराच्या हल्ल्यामुळे एक माणूस गंभीर जखमी झाला.तर एका माणसाच्या बोटाचा तुकडा पडला.  बॅंकेतील एकूण  4 जखमींनी स्थानिक रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. या रानडुक्कराचे  सगळे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले. तर टेलिस्कोपच्या माध्यामातून त्याच्यावर लक्षही ठेवण्यात आलं. अखेर या रानडुक्कराला गोळ्या घालून ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले. पण या सगळ्या गोंधळात दुसरे रानडुक्कर शहराच्या बाहेर निसटले.

दरम्यान या रानडुक्करांचा व्हिडिओ मात्र फेसबुकवर  व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2017 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close