मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोनाच्या तीव्र लाटेतही काहीजण Covid -19 च्या संसर्गापासून कसे बचावले? संशोधनातून येणार नवी माहिती समोर

कोरोनाच्या तीव्र लाटेतही काहीजण Covid -19 च्या संसर्गापासून कसे बचावले? संशोधनातून येणार नवी माहिती समोर

कोव्हिड-19 (Covid-19)च्या लाटेचा फटका जगभरातील कोट्यवधी लोकांना बसला. हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली, लाखो लोकांचे जीव गेले. ज्यांना कोविड झाला त्यांनाच या संसर्गाचं गांभीर्य आणि त्यातून वाचण्यासाठीची जीवघेणी धडपड सर्वांनाच माहिती आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 30 जून :  कोव्हिड-19 (Covid-19)च्या लाटेचा फटका जगभरातील कोट्यवधी लोकांना बसला. हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली, लाखो लोकांचे जीव गेले. ज्यांना कोविड झाला त्यांनाच या संसर्गाचं गांभीर्य आणि त्यातून वाचण्यासाठीची जीवघेणी धडपड सर्वांनाच माहिती आहे. आतापर्यंत ज्यांना संसर्ग झाला आणि ते त्यातून बरे झाले त्या लोकांबद्दल बरंच बोललं गेलं आहे. पण कोविड-19 चे अनेक रुग्ण आसपास असूनही ज्यांना संसर्ग झाला नाही असंही अनेक लोक आहेत. वॉशिंग्टन पोस्ट (Washington Post) मध्ये या वर्षीच्या मे महिन्यात एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामध्ये ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही त्यांच्याबद्दल या रिपोर्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. अगदी ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार (Omicron variant) होत असतानाही हे लोक संसर्गापासून बचावले आहेत. ज्यांना संसर्ग झाला आणि त्यातून बरे झालेल्यांपेक्षा ज्या लोकांना कोविडचा संसर्ग झाला नाही ते या आजारापासून वाचण्याबाबत जास्त चांगली माहिती देऊ शकतील असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रतिकार करणाऱ्या घटकांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास सुरु असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. क्लिनिकल मायक्रोबायॉलॉजिस्ट आणि न्यूयॉर्कच्या रॉकफेलर युनिव्हर्सिटीचे फेलो अँड्रेस स्पॅन यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केलं जात आहे. या अंतर्गत त्याने 700 सहभागींची आतापर्यंत नोंद करून घेतली आहे. कोविड-19 च्या संसर्गातून बचावलेल्या जवळपास 5,000 जणांच्या या अंतर्गत चाचण्या केल्या जात आहेत. या ग्रुपच्या संसर्गासाठीच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आणि अँटीबॉडीजही तपासण्यात येत आहेत, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामध्ये सहभागी झालेली नर्स भूलतज्ज्ञ बेव्हिन हिनं आपला अनुभव यामध्ये सांगितला आहे. कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सतत काम करूनही ती संसर्गापासून दूर कशी राहिली याबबातचा अनुभव तिनं यात सांगितला आहे. हॉस्पिटलमध्ये काम करताना तिनं कधीही मास्क घातलेला नव्हता. पण मास्क न घालताही तिला संसर्ग झाला नाही. यामुळेच या अभ्यासात स्वयंसेविका म्हणून तिची निवड करण्यात आली. 8 बायका आणि फजिती ऐका! एकाच वेळी सर्वांना सांभळताना नवऱ्याच्या नाकीनऊ तर ज्या लोकांना कोरोनाचा कधीच संसर्ग झालेला नाही त्यांच्या जनुकांचा आणि अन्य जैविक घटकांचा अभ्यास यामध्ये केला जात असल्याचं ब्राऊन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील साथरोगाच्या प्रोफेसर (epidemiology) जेनिफर नुझो यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं आहे. कदाचित यामुळे व्हायरसचा प्रसार कसा होतो, मानवी शरीराला त्याचा संसर्ग कसा होतो यावर प्रकाश पडू शकेल, असंही त्या म्हणाल्या. HIV, टीबी आणि फ्लूसारख्या साथीच्या किंवा सहज संसर्ग होणाऱ्या आजारांमध्ये लोकांचे अनुवांशिक घटक आणि प्रतिकारशक्ती यांचा जवळचा संबंध असतो असं या पूर्वीच्या अभ्यासातूनही समोर आलं आहे. आता कोविड-19 चा सामना करणाऱ्यांमध्येही अशा प्रकारचं अनुवांशिक वैशिष्ट्य असतं का, हे शोधणं या नवीन अभ्यासाचा मुख्य हेतू आहे.
First published:

Tags: Coronavirus, Covid-19

पुढील बातम्या